LPG Price Hike: घ्या आता...! घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ झाली; किंमत हजाराला टेकली

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2022 08:52 AM2022-05-07T08:52:31+5:302022-05-07T08:54:35+5:30

गृहीणींच्या स्वयंपाकाला चांगलीच फोडणी मिळाली आहे. यामुळे घर खर्चाचे बजेट कोलमडणार आहे.

LPG Price Hike: 14.2 kg Domestic LPG cylinder increased by Rs 50 with effect from today, 999.50/cylinder in Mumbai Pune | LPG Price Hike: घ्या आता...! घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ झाली; किंमत हजाराला टेकली

LPG Price Hike: घ्या आता...! घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ झाली; किंमत हजाराला टेकली

googlenewsNext

मे महिन्याच्या पहिल्याच तारखेला इंधन कंपन्यांनी कमर्शिअल गॅस सिलिंडरच्या किंमतीत १०४ रुपयांची वाढ केली होती. परंतू घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीला हातही लावला नव्हता. परंतू सातव्या दिवशीच कंपन्यांनी सामान्यांना जोराचा धक्का दिला आहे. घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत ५० रुपयांची वाढ केली आहे. 

आजच्या या दरवाढीनंतर घरगुती गॅस सिलिंडरची किंमत 999.50 रुपये झाली असून गृहीणींच्या स्वयंपाकाला चांगलीच फोडणी मिळाली आहे. यामुळे घर खर्चाचे बजेट कोलमडणार आहे. या आधी मुंबईत विना अनुदानीत गॅस सिलिंडरची किंमत ९४९,५० रुपये होती. 


दिल्लीत १९ किलोच्या कमर्शिअल गॅस सिलिंडरचे दर १०२.५० रुपयांनी वाढून २३५५ रुपये प्रति सिलिंडर झाले. यापूर्वी १ एप्रिल रोजी कमर्शिअल सिलिंडरचे दर २६८.५० रुपयांनी वाढले होते. 

आरबीआयने महागाई वाढल्यामुळे काही दिवसांपूर्वीच अचानक मिटिंग घेत रेपो रेट वाढविले होते. यामुळे लोकांनी घेतलेल्या कर्जावरील व्याजदर वाढणार आहेत. त्यातच आता गॅसच्या दरात वाढ झाल्याने महागाई आणखी वाढणार आहे. 

Web Title: LPG Price Hike: 14.2 kg Domestic LPG cylinder increased by Rs 50 with effect from today, 999.50/cylinder in Mumbai Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.