lok sbha election 2019 watchmans village | मोदींच्या वाराणसीत चौकीदारांचा गाव; चोरांना मज्जाव
मोदींच्या वाराणसीत चौकीदारांचा गाव; चोरांना मज्जाव

मुंबई - हे चौकिदाराचे गाव आहे त्यामुळे येथे चोरांना येण्यास बंदी आहे. अशी पोस्टर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दत्तक घेतलेल्या गावात लावण्यात आली आहेत. अशा पोस्टर मुळे, वाराणसी मधील ककरहिया हे गाव चर्चेत आले आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत 'चौकिदार चोर है' वाक्य मोठ्याप्रमाणात चर्चेत पहायला मिळत आहे. त्यातच आता ककरहियाच्या गावकऱ्यांनी संपूर्ण  गावकरी चौकीदार असल्याचे पोस्टर जागोजागी लावली असल्याने चौकीदार आणि चोर शब्द पुन्हा चर्चेत आले आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासदार दत्तक योजनेतंर्गत ककरहिया हे गाव २३ ऑक्टोबर २०१७ ला दत्तक घेतले. मोदींनी गाव दत्तक घेतल्यानंतर गावाचा कायापालटच झाला आहे. विकासापासून दूर असलेल्या या गावात आता मोठ्याप्रमाणात कामे झाली आहे. आधीच्या कोणत्याच सरकारने कधीच आमच्या गावाकडे लक्ष दिले नाहीत. पंतप्रधान मोदींनी आमच्या गावचा चित्र पूर्णच बदलून टाकले. असे येथील गावकऱ्यांचे म्हणणे आहे.

 भाजप पक्षाच्या नेतेमंडळीनी आपल्या नावासमोर चौकिदार असा उल्लेख केला. मोदींनी आपल्या आपल्या अनेक सभेत, मी देशाचा चौकीदार असल्याचे बोलून दाखवले होते. त्याला उत्तर देत, राहुल गांधीने 'चौकीदार चोर है' असा टोला लागवला होता. त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात सुद्धा गेले असल्याचे पहायला मिळाले.  

आपल्या नावापुढे चौकीदार लावणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दत्तक गावातील गावकऱ्यांनी, हे चौकीदारांचा गाव असून येथे चोरांनी येऊ नयेत असा संदेश पोस्टरच्या माध्यमातून दिला आहे. त्यामुळे विरोधक सुद्धा या गावात जाण्यास टाळत असल्याचे दिसत आहे.

 


Web Title: lok sbha election 2019 watchmans village
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.