'बसंती' हेमा मालिनीच्या प्रचारासाठी 'वीरु' धर्मेंद्र मैदानात

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2019 04:09 PM2019-04-14T16:09:47+5:302019-04-14T16:10:41+5:30

रिअल लाईफमध्येही बसंतीच्या प्रचारासाठी वीरुने अर्थात अभिनेता धर्मेंद्रने प्रचाराच्या रणांगणात उडी घेतली आहे. मथुरामध्ये हेमा मालिनीचा प्रचार करण्यासाठी धर्मेद्र यांनी प्रचार सभेला संबोधित केलं

Lok Sabha Elections 2019 : Actor Dharmendra campaigning for Hema Malini | 'बसंती' हेमा मालिनीच्या प्रचारासाठी 'वीरु' धर्मेंद्र मैदानात

'बसंती' हेमा मालिनीच्या प्रचारासाठी 'वीरु' धर्मेंद्र मैदानात

googlenewsNext

आग्रा - शोले सिनेमातील हिट जोडी म्हणजे बसंती आणि वीरु...हीच बसंती हेमा मालिनी सध्या निवडणुकीच्या प्रचारात गुंतली आहे. रिअल लाईफमध्येही बसंतीच्या प्रचारासाठी वीरुने अर्थात अभिनेता धर्मेंद्रने प्रचाराच्या रणांगणात उडी घेतली आहे. मथुरामध्येहेमा मालिनीचा प्रचार करण्यासाठी धर्मेद्र यांनी प्रचार सभेला संबोधित केलं. 

रविवारी मथुरा लोकसभा मतदारसंघाच्या भाजपाच्या उमेदवार हेमा मालिनी यांना मतदान करण्याचं आवाहन अभिनेता धर्मेंद्र यांनी केलं. मी स्वत: शेतकऱ्याचा मुलगा आहे. हेममालिनी या शहराच्या विकासासाठी प्रयत्न करत आहे. हेमा मालिनीचा विजय म्हणजे मथुरावासियांचा विजय आहे. शेतात घाम गाळणारा शेतकरी गरज भासल्यास देशाच्या रक्षणासाठीही सज्ज असतो. जाट समुदायाला मतदान करण्याचं आवाहन अभिनेता धर्मेंद्र यांच्याकडून करण्यात आलं. तळपत्या उन्हात लोकांनी मोठ्या प्रमाणात धर्मेंद्रला बघण्यासाठी गर्दी केली होती. मोबाईलमध्ये हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांचे छायाचित्र काढण्यासाठी लोकांची गर्दी झाली होती.



 

भाजपाच्या उमेदवार आणि अभिनेत्री हेमा मालिनी आपल्या मतदारसंघात अनोख्या पद्धतीने प्रचार करताना दिसत आहेत. एकदा प्रचारादरम्यान हेमा मालिनी शेतात गव्हाचे पीक कापताना शेतमजूर महिलांसोबत दिसल्या. तर दुसरीकडे ट्रॅक्टर चालवताना दिसून आल्या. दरम्यान, यासंबंधीचे त्यांचे फोटो सोशल मीडियात व्हायरल होत आहेत. 

हेमा मालिनी यांनी 2004 मध्ये हेमा मालिनीने भाजपाध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्या 2003 ते 2009 या काळात राज्यसभेच्या सदस्य होत्या. 2014 लोकसभा निवडणुकीत हेमा मालिनी मथुरा मतदारसंघामधून लोकसभेवर निवडून आल्या. त्यानंतर यंदाच्या निवडणुकीत पुन्हा त्यांना भाजपाने मथुरा याच मतदार संघातून रिंगणात उतरविले आहे. दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडण्यास सुरुवात झाल्याने त्यांच्यातील कलगीतुरा चांगलाच रंगात येऊ लागला आहे.
 

Web Title: Lok Sabha Elections 2019 : Actor Dharmendra campaigning for Hema Malini

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.