lok sabha election 2019 Twist on child claims aap candidate | तिकीटासाठी 'आप'ने पैसे घेतल्याच्या आरोपांत ट्विस्ट; उमेदवारने फेटाळला मुलाचा दावा
तिकीटासाठी 'आप'ने पैसे घेतल्याच्या आरोपांत ट्विस्ट; उमेदवारने फेटाळला मुलाचा दावा

नवी दिल्ली - आम आदमी पक्षाचे पश्चिम दिल्लीतील उमेदवार बलबीर सिंह जाखड यांचा मुलगा उदय जाखड याने, तिकीटासाठी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ६ कोटी रुपये घेतल्याचा आरोपानंतर यात नवीन खुलासा समोर आला आहे. बलबीर जाखड यांनी मुलाने केलेले सर्व आरोप फेटाळून लावत मुलाचा आणि माझा कोणतेही नाते-संबध नसल्याचा खुलासा केला आहे.

केजरीवाल यांनी उमेदवारीसाठी ६ कोटी घेतल्याचे सर्व आरोप खोटे असल्याचा खुलासा बलबीर जाखड यांनी केला आहे. बलबीर जाखड म्हणाले की, त्यांचा मुलगा उदय जाखड जन्मल्यानंतरपासून स्वतंत्र राहत आहेत. उदय याचा जन्म २००१ मध्ये झाला, त्यावेळी माझी पत्नी माहेरी होती. त्यांनतर, ती कधीच घरी आली नाही. २००९ मध्ये आमचा घटस्फोट झाला. तेव्हापासून माझ्या पत्नीचा आणि मुलाचा माझ्याशी कोणतेही संबंध राहिले नाही.पुढे बलबीर जाखड म्हणाले, उदय हा कधीच मला भेटायला आला नाही. परंतु कधी-कधी काही वस्तूंची खरेदीसाठी त्याचा मला फोन येत असतो. मात्र त्याने, अश्याप्रकारे आरोप कसे आणि का केले हे मला अजूनही कळाले नाही. आचारसंहिता असल्यामुळे आता जास्त बोलता येणार नसल्याचे बलबीर जाखड म्हणाले.

रविवारी दिल्लीत सहाव्या टप्प्यात मतदान होणार आहे. मात्र, मतदानापूर्वी केजरीवाल यांच्यावर गंभीर आरोप झाल्याने दिल्लीचे राजकरण तापले होते. बलबीर जाखड यांनी मात्र पत्रकार परिषद घेत मुलाने केलेले आरोप खोटे असल्याच्या दावा केला आहे.


Web Title: lok sabha election 2019 Twist on child claims aap candidate
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.