Lok Sabha Election 2019 Phase 4 Live Voting News and Updates in Marathi | Lok Sabha Election Voting Live: चौथ्या टप्प्यात 6 वाजेपर्यंत 60.31% मतदान
Lok Sabha Election Voting Live: चौथ्या टप्प्यात 6 वाजेपर्यंत 60.31% मतदान

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीतील चौथ्या टप्प्याचं मतदान पार पडणार आहे. 9 राज्यांमधील 71 जागांवर थोड्याच वेळात मतदान सुरू होईल. भाजपा आणि मित्रपक्षांच्या दृष्टीनं चौथ्या टप्प्यातलं मतदान अतिशय महत्त्वाचं आहे. आज मतदान होत असलेल्या जागांपैकी सुमारे 67 टक्के जागा सध्या भाजपाकडे आहेत. त्या जागा राखणे ही भाजपाची प्राथमिकता आहे. त्याच वेळी गेल्या पाच वर्षांमध्ये बदललेल्या वातावरणाचा फायदा घेत, कॉँग्रेस, तसेच अन्य विरोधक भाजपच्या जागा खेचण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे या उर्वरित टप्प्यांमध्ये होत असलेल्या जागांच्या निवडणुकीमधून देशात कोण सरकार स्थापन करणार, हे निश्चित होणार आहे. 

आज मतदान होत असलेल्या 71 पैकी 56 जागा सध्या भाजपा आणि मित्रपक्षांकडे आहेत. तर 2 जागा काँग्रेसकडे आहेत. आज महाराष्ट्रातील 17, राजस्थान आणि उत्तर प्रदेशातील प्रत्येकी 13-13, पश्चिम बंगालमधील 8, मध्य प्रदेश आणि ओदिशातील प्रत्येकी 6-6, बिहारमधील 5 आणि झारखंडमधील 3 जागांवर आज मतदान होत आहे. राजस्थान आणि मध्य प्रदेशातील एकूण 54 जागांवर आज मतदान होत आहे. यातील तब्बल 52 जागा सध्या भाजपाकडे आहेत. मात्र गेल्या वर्षाच्या अखेरीस झालेल्या निवडणुकीत भाजपानं या दोन्ही राज्यातील सत्ता गमवावी लागली. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला कौल देणारी ही राज्य काँग्रेसला 'हात' देणार की पुन्हा एकदा इथे 'कमळ' उमलणार हे पाहणं महत्त्वपूर्ण ठरणार आहे. 
 

LIVE

Get Latest Updates

06:39 PM

देशात 6 वाजेपर्यंत 60.31% मतदान

06:09 PM

अंबानी कुटुंबीयांनी मतदानाचा हक्क बजावला

उद्योगपती मुकेश अंबानी यांनी आपल्या कुटुंबीयांसह मुंबईत मतदान केले. 

04:57 PM

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खाननं सपत्नीक बजावला मतदानाचा हक्क 

04:41 PM

देशात 4 वाजेपर्यंत 49.63% मतदान

03:35 PM

दुपारी 3 पर्यंत 49.45% मतदान

03:15 PM

जम्मू-काश्मीर : बुमठानमधील 63 क्रमांकच्या मतदान केंद्रावर मतदान करताना नागरीक. 

02:24 PM

चौथ्या टप्प्यात दोन वाजेपर्यंत 38.63 टक्के मतदान 

02:06 PM

दुपारी दोनपर्यंत झालेल्या मतदानाची टक्केवारी- बिहार 37.71, मध्य प्रदेश- 43.44, महाराष्ट्र- 29.94, ओडिशा- 35.79, राजस्थान- 44.62, उत्तर प्रदेश- 34.42, पश्चिम बंगाल- 52.37, झारखंड- 44.90

01:44 PM

पश्चिम बंगालमध्ये बंपर मतदान; दुपारी दीड वाजेपर्यंत 52.37 टक्के मतदान

01:35 PM

मुंबई: ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन, जया बच्चन, अभिषेक बच्चन यांनी बजावला मतदानाचा हक्क 

01:34 PM

मुंबई: केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी पतीसह केलं मतदान 

01:22 PM

पश्चिम बंगालमध्ये बंपर मतदान; 50 टक्क्यांहून अधिक मतदान

01:10 PM

मुंबई: अभिनेत्री आणि भाजपाच्या उमेदवार हेमा मालिनी यांनी मुलींसह केलं मतदान 

12:49 PM

मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्नीसह बजावला मतदानाचा हक्क; युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंनीदेखील केलं मतदान 

12:48 PM

मुंबई: जावेद अख्तर, शबाना आझमींनी केलं मतदान 

12:34 PM

दुपारी 12 पर्यंत झालेल्या मतदानाची टक्केवारी: बिहार 18.26, मध्य प्रदेश- 28.67, महाराष्ट्र- 17.75, ओडिशा- 19.67, राजस्थान- 29.41, उत्तर प्रदेश- 21.18, पश्चिम बंगाल- 35.10, झारखंड- 29.21

12:27 PM

मुंबई: चित्रपट निर्माते मधूर भांडारकर यांनी वांद्र्यात केलं मतदान 

12:23 PM

मुंबई: उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी मलबार हिलमध्ये बजावला मतदानाचा हक्क 

12:12 PM

पश्चिम बंगालमध्ये दुपारी 12 पर्यंत 35.10 टक्के मतदान

11:36 AM

मुंबई: काँग्रेसच्या उत्तर मध्य मतदारसंघाच्या उमेदवार प्रिया दत्त यांनी वांद्र्यात केलं मतदान 

11:29 AM

झारखंड: सकाळी 11 पर्यंत 29.21 टक्के मतदान 

11:28 AM

बिहार: पाच लोकसभा मतदारसंघांमध्ये 17.07 टक्के मतदान 

11:12 AM

मुंबई: अभिनेत्री भाग्यश्री, सोनाली बेंद्रे यांनी विलेपार्ल्यात बजावला मतदानाचा हक्क 

11:03 AM

मुंबई: अभिनेते अनुपम खेर यांनी जुहूतील मतदान केंद्रावर बजावला मतदानाचा हक्क 

10:50 AM

मुंबई: अभिनेत्री भाग्यश्री, सोनाली बेंद्रे यांनी विलेपार्ल्यात बजावला मतदानाचा हक्क 

10:39 AM

दिल्ली- पश्चिम बंगालमधील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर भाजपाचं शिष्टमंडळ निवडणूक आयोगाची भेट घेणार 

10:30 AM

सकाळी 10 पर्यंत 10.42 टक्के मतदान; महाराष्ट्र- 6.66%, बिहार- 10.76%, मध्य प्रदेश- 11.45%, ओडिशा- 8.34%, राजस्थान- 12.22%, उत्तर प्रदेश- 9.87%, पश्चिम बंगाल 16.90%, झारखंड-12%

09:56 AM

महाराष्ट्रात सकाळी 9 पर्यंत 6.82 टक्के, मध्य प्रदेशात 11.11 टक्के, ओडिशात 9 टक्के, पश्चिम बंगालमध्ये 16.90 टक्के मतदान 

09:53 AM

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ताडदेवमध्ये बजावला मतदानाचा हक्क 

09:34 AM

पश्चिम बंगाल: तृणमूल आणि भाजपा कार्यकर्ते आमनेसामने 

09:24 AM

पश्चिम बंगाल: भाजपा उमेदवार बाबुल सुप्रियो यांच्या गाडीची आसनसोलमध्ये तोडफोड 

09:13 AM

बिहार: बेगुसरायचे सीपीआय उमेदवार कन्हैया कुमार यांनी बजावला मतदानाचा हक्क 

08:54 AM

उत्तर प्रदेश: कनौजमधील बूथ क्रमांक 189 आणि 196मधील ईव्हीएममध्ये बिघाड 

08:41 AM

मुंबई: उत्तर मुंबईच्या काँग्रेस उमेदवार उर्मिला मांतोडकर यांनी वांद्र्यात केलं मतदान 

08:35 AM

मध्य प्रदेश: मुख्यमंत्री कमलनाथ यांनी शिकारपूरमध्ये बजावला मतदानाचा हक्क 

08:31 AM

बिहार: बेगुसरायमधील सीपीआयचे उमेदवार कन्हैया कुमार मतदान करण्यासाठी पोहोचले 

08:16 AM

मुंबई: विलेपार्ल्यातल्या जमना बाई स्कूलमध्ये भाजपा खासदार परेश रावल यांनी सपत्नीक बजावला मतदानाचा हक्क 

08:14 AM

मुंबई: उत्तर प्रदेशातल्या गोरखपूरचे भाजपा उमेदवार रवी किशन यांनी गोरेगावात बजावला मतदानाचा हक्क 

07:54 AM

मुंबई: आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी पेडर रोडवर बजावला मतदानाचा हक्क 

07:49 AM

मुंबई: उत्तर प्रदेशातल्या गोरखपूरचे भाजपा उमेदवार रवी किशन गोरेगावात मतदानासाठी रांगेत 

07:47 AM

बिहार: केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते गिरीराज सिंह यांनी लाखिसराईत केलं मतदान 

07:44 AM

मुंबई: ज्येष्ठ अभिनेत्री रेखा यांनी वांद्र्यात बजावला मतदानाचा हक्क 

07:35 AM

उत्तर प्रदेशातील हमीरपूरच्या बूथ क्रमांक 111 मधील मतदान थांबलं; ईव्हीएममध्ये बिघाड झाल्यानं खोळंबा

 

 

 

07:33 AM

पश्चिम बंगालमध्ये मतदानाला सुरुवात 

07:32 AM

राजस्थान: माजी मुख्यमंत्री आणि भाजपा नेत्या वसुंधराराजे यांनी झालवारमध्ये केलं मतदान 

07:29 AM

मुंबई: उद्योगपती अनिल अंबानी यांनी बजावला मतदानाचा हक्क 

English summary :
Lok Sabha Election 2019 Phase 4 Live News: Today, Election will be taking place in India's' 71 seats in 9 states. Bihar, Jammu, and Kashmir, Jharkhand, Madhya Pradesh, Maharashtra. Odisha, Rajasthan, Uttar Pradesh, West Bengal are those 9 states. Lokmat covers all latest news in Marathi from general Sabha Election 2019.


Web Title: Lok Sabha Election 2019 Phase 4 Live Voting News and Updates in Marathi
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.