Lok Sabha Election 2019 after a meeting with manoj tiwari sapna rejects congress | भाजपनेते मनोज तिवारीच्या भेटीनंतर सपनाचा काँग्रेसपासून दुरावा ?
भाजपनेते मनोज तिवारीच्या भेटीनंतर सपनाचा काँग्रेसपासून दुरावा ?

नवी दिल्ली - हरियाणाची प्रसिद्ध डान्सर सपना चौधरी हिने काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचे वृत्त रविवारी फेटाळले होते. पंरतु, त्यानंतर व्हायरल झालेल्या दोन नवीन फोटोमुळे सपनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. ज्या गुलाबी ड्रेसमध्ये सपना चौधरी माध्यमांसमोर आली होती, त्याच ड्रेसमध्ये सपना भाजप नेते मनोज तिवारी यांच्यासोबत व्हायरल फोटोमध्ये दिसत आहे. दोघांच्या भेटीचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

काँग्रेसमध्ये सामील होण्याचे वृत्त फेटाळणारी सपना चौधरी भाजपमध्ये सामील होणार असल्याचे बोलले जात आहे. या संदर्भात मनोज तिवारी यांची प्रतिक्रिया आली असून ती भाजपमध्ये येणार की नाही, हे येणाऱ्या काळातच समजेल, असंही तिवारी यांनी म्हटले आहे.

सपनाने रविवारी पत्रकार परिषद घेऊन आपण काँग्रेसमध्ये सामील झालो नसल्याचे म्हटले होते. तसेच सोशल मीडियावर व्हायरल झालेले फोटो जुने होते, असंही सपनाच्या वतीने सांगण्यात आले होते. माझी काँग्रेसमध्ये जाण्याची इच्छा नसून मी काँग्रेससाठी प्रचार देखील करणार नाही. तसेच मी राज बब्बर यांना कधी भेटले नव्हते, असंही सपनाने माध्यमांना सांगितले.

दरम्यान सपनाने केलेल्या दाव्यांवर आता प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. सपनाने काँग्रेसचे सदस्यत्व घेतल्याचे फोटो समोर आले आहे. तसेच सदस्यपदासाठीचा तिचा अर्ज देखील काँग्रेसकडून दाखविण्यात आला आहे. यावर सपनाची सही आहे. त्यामुळे खरं नेमकं काय हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

 


Web Title: Lok Sabha Election 2019 after a meeting with manoj tiwari sapna rejects congress
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.