Lockdown in West Bengal: भावाच्या मृत्यूनंतर ममता बॅनर्जी सावध; पश्चिम बंगालमध्ये १५ दिवसांच्या कडक लॉकडाऊनची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2021 01:27 PM2021-05-15T13:27:53+5:302021-05-15T13:28:36+5:30

Lockdown in West Bengal: कोरोनाचे वाढते संकट पाहता पश्चिम बंगालमध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. मुख्य सचिव अलपन बंडोपाध्याय यांनी लॉकडाऊनचे आदेश जारी केले आहेत.

Lockdown in West Bengal: announces full lockdown from May 16 for next 15 days coronaVirus | Lockdown in West Bengal: भावाच्या मृत्यूनंतर ममता बॅनर्जी सावध; पश्चिम बंगालमध्ये १५ दिवसांच्या कडक लॉकडाऊनची घोषणा

Lockdown in West Bengal: भावाच्या मृत्यूनंतर ममता बॅनर्जी सावध; पश्चिम बंगालमध्ये १५ दिवसांच्या कडक लॉकडाऊनची घोषणा

Next

Lockdown in West Bengal:  महिनाभरापूर्वी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत निवडणुकीच्या मोठमोठ्या रॅली काढणाऱ्य़ा पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) उद्यापासून कडकडीत लॉकडाऊन लावण्यात आला आहे. महत्वाचे म्हणजे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) य़ांच्या धाकट्या भावाचे आजच सकाळी कोरोनामुळे निधन झाले आहे. यामुळे ममता यांनी राज्याला कोरोनाची झळ बसू नये यासाठी 30 मे पर्यंत लॉकडाऊन (Lockdown in West Bengal) करण्य़ाचा निर्णय घेतला आहे. (West Bengal announces full lockdown from May 16 for next 15 days)

Coronavirus : ममता बॅनर्जींना बंधुशोक, धाकट्या भावाचे कोरोनामुळे निधन


कोरोनाचे वाढते संकट पाहता पश्चिम बंगालमध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. मुख्य सचिव अलपन बंडोपाध्याय यांनी लॉकडाऊनचे आदेश जारी केले आहेत. बंगालमध्ये 16 मे ते 30 मे पर्यंत लॉकडाऊन लावण्यात आला आहे. या काळात केवळ अत्यावश्यक सेवाच सुरु राहणार आहेत. खासगी ऑफिस, शाळा-कॉलेज बंद राहणार आहेत. फळे, भाज्या आणि किराना दुकाने सकाळी 7 ते 10 वाजेपर्यंतच सुरु राहणार आहेत. 


पश्चिम बंगालमध्ये 15 दिवसांचा लॉकडाऊन लावण्यात आला आहे. रात्री 9 ते पहाटे 5 वाजेपर्यंत लोकांच्या बाहेर पडण्यावर बंदी आहे. पश्चिम बंगालमध्ये कोरोनाचे संक्रमण वेगाने पसरू लागले आहे. राज्य सरकारच्या बुलेटीननुसार शुक्रवारी बंगालमध्ये 20,846 नवे रुग्ण सापडले आहेत. 136 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. संक्रमण दर हा 30 टक्क्यांच्या आसपास आहे. जेव्हा बंगालमध्ये निवडणुकीची घोषणा झाली होती, तेव्हा हाच दर 1 टक्क्यांपेक्षाही कमी होता. सध्या बंगालमध्ये 1,31,792 रुग्ण उपचार घेत आहेत. 


काय असेल बंद -
- सर्व सरकारी आणि खासगी कार्यालये (अत्यावश्यक सेवा वगळता), शाळा, महाविद्यालये बंद राहतील. 
- राजकीय, सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांवर बंदी असेल.
- आत्यावश्यक सेवा वगळता सर्व इंडस्ट्रीज-फॅक्ट्रीज बंद राहतील. 
- अत्यावश्यक सेवेत असलेले ट्रक वगळता इतरांच्या हालचालींवर बंदी असेल.
- इमरजन्सी शिवाय खासगी कार, टॅक्सी, ऑटो चालणार नाही.
- लोकल ट्रेन, मेट्रो सेवा, बस सेवा, ट्रेन सेवा बंद राहतील.

धाकट्या भावाचे कोरोनाने निधन

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे धाकटे भाऊ असीम बंडोपाध्याय यांचे आज सकाळी निधन झाले. त्यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाचा संसर्ग झाला होता. असीम बंडोपाध्याय गेल्या महिनाभरापासून कोरोनावर उपचार घेत होते. दरम्यान, आज सकाळी त्यांची प्रकृती अधिकच बिघडली आणि त्यातच त्यांचा प्राणज्योत मालवली. बंडोपाध्याय यांच्या कुटुंबातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार असीम बंडोपाध्याय यांच्यावर कोविड प्रोटोकॉलचे पालन करून अंत्यसंस्कार करण्यात येतील.

Web Title: Lockdown in West Bengal: announces full lockdown from May 16 for next 15 days coronaVirus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.