निवडणूक आयोगाचा आदेश लोजप, काँग्रेसने पाळला नाही; गुन्हेगारी माहिती जाहीर केली नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2020 08:06 AM2020-10-21T08:06:19+5:302020-10-21T08:06:25+5:30

उमेदवारांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची माहिती प्रकाशित करण्याच्या निवडणूक आयोगाच्या आदेशांचे पालन न करणाऱ्यांमध्ये फक्त काँग्रेस किंवा लोजपच नाहीत.

LJP, Congress did not follow Election Commission order No criminal information was released | निवडणूक आयोगाचा आदेश लोजप, काँग्रेसने पाळला नाही; गुन्हेगारी माहिती जाहीर केली नाही

निवडणूक आयोगाचा आदेश लोजप, काँग्रेसने पाळला नाही; गुन्हेगारी माहिती जाहीर केली नाही

Next

नवी दिल्ली :काँग्रेस आणि लोजपने आयोगाने दिलेल्या आदेशाप्रमाणे या उमेदवारांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची माहिती वृत्तपत्रे, समाज माध्यमे आणि आपल्या संकेतस्थळांवर प्रकाशित करायला हवी होती; परंतु हे काम या दोन्ही पक्षांनी १९ ऑक्टोबरच्या रात्रीपर्यंत तरी केले नव्हते. 

उमेदवारांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची माहिती प्रकाशित करण्याच्या निवडणूक आयोगाच्या आदेशांचे पालन न करणाऱ्यांमध्ये फक्त काँग्रेस किंवा लोजपच नाहीत. माजी केंद्रीय मंत्री उपेंद्र कुशवाह यांच्या राष्ट्रीय लोक समता पक्षाचा समावेश निवडणूक आयोगाच्या आदेशाचे पालन न करणाºया इतर प्रमुख पक्षांमध्ये आहे.
 

Web Title: LJP, Congress did not follow Election Commission order No criminal information was released

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.