‘आप’च्या यशानंतर कुमार विश्वास यांना नेटकऱ्यांनी धुतले!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2020 04:44 AM2020-02-13T04:44:37+5:302020-02-13T04:45:06+5:30

एकेकाळी कुमार विश्वास हे अरविंद केजरीवालाचे अत्यंत विश्वासु होते. केजरीवालांबरोबर मतभेद झाल्याने 'आप'मधून ते बाहेर पडले.

Kumar Biswas trolled by netizans after 'Aap' success! | ‘आप’च्या यशानंतर कुमार विश्वास यांना नेटकऱ्यांनी धुतले!

‘आप’च्या यशानंतर कुमार विश्वास यांना नेटकऱ्यांनी धुतले!

Next

प्राजक्ता ढेकळे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीत ६२ जांगावर विजय मिळवल्याने 'आप'वर सोशल मीडियावरून शुभेच्छांचा वर्षाव झाला. मात्र, प्रारंभी केजरीवालांसोबत काम केलेल्या कवी कुमार विश्वास यांच्यावर मात्र नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर सोलून काढले. अनेक नेटकºयांनी कुमार यांची व्यंगांद्वारे खिल्ली उडवली. भाजपभक्त व काँग्रेस नेते यांच्याबरोबरच नेटकºयांनी कुमार विश्वासवरही मीम्स बनवल्याचे दिसून आले.


एकेकाळी कुमार विश्वास हे अरविंद केजरीवालाचे अत्यंत विश्वासु होते. केजरीवालांबरोबर मतभेद झाल्याने 'आप'मधून ते बाहेर पडले. त्यानंतर सातत्याने कुमार विश्वास सतत आप व केजरीवाल यांच्यावर टीका करत राहिले. विश्वास यांनी केजरीवालांना 'स्वमग्न बुटका' असेही म्हणूनही हिणवलं होते. विधानसभा निवडणूक प्रचारावेळीही त्यांनी आपच्या विरोधात उघड भूमिका घेऊ न टीकेची झोड उठवली होती.


मतदानाच्या दिवशी 'मागील पाच वर्षाचा कलंक धुवून काढण्याची वेळ दिल्लीकरांना आली आहे. मतदानद्वारे समाज, देश, आशा, सेना, मित्रत्व व विश्वासाचा खून करणाºया राजकीय एड्स आत्ममुग्ध बुटक्याचे निकृष्ट मनसुबे उद्ध्वस्त करण्याची वेळ आली आहे. घरातून हाकलून काढून द्या आणि सांगा की अंहकारी शिशुपालांही आम्ही संपवू शकतो, असे ट्विट करून कुमार विश्वास यांनी केजरीवालांना लक्ष्य केले होते.

आता बरनॉल मागवा!
मात्र 'आप' च्या विजयानंतर नेटकºयांनी मीम्सद्वारे कुमार विश्वास यांना धुवून काढले.
एका युजरने जळाल्यानंतर जखमेवर लावयाच्या 'बरनॉल क्रीम' चा फोटो टाकून, कुमार विश्वास यांना ते मागवण्याचा सल्ला दिला.
चित्रपटातील संवाद, गाण्याद्वारे मीम्स करत अरविंद केजरीवाल व कुमार विश्वास यांचे फोटोही पोस्ट केले आहेत.

Web Title: Kumar Biswas trolled by netizans after 'Aap' success!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.