पॉर्न सर्च करणाऱ्यांनो, पोलिसांच्या 'या' व्हायरल मेसेजमागील सत्य जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2021 10:53 AM2021-02-25T10:53:29+5:302021-02-25T10:56:01+5:30

पाहा काय आहे या मेसेजमागील सत्य आणि काय म्हणाले पोलीस

know the truth of polices viral sms for internet child porn searchers uttar pradesh | पॉर्न सर्च करणाऱ्यांनो, पोलिसांच्या 'या' व्हायरल मेसेजमागील सत्य जाणून घ्या

पॉर्न सर्च करणाऱ्यांनो, पोलिसांच्या 'या' व्हायरल मेसेजमागील सत्य जाणून घ्या

googlenewsNext
ठळक मुद्देचाईल्ड पॉर्न सर्च करणाऱ्याबद्दल आहे हा मेसेजसोशल मीडियावर तेजीनं होतोय व्हायरल

सध्या एक मेसेज तेजीनं व्हायरल होत आहे. तसंच लोकांना मिळणाऱ्या या मेसेजमध्ये चाईल्ड पॉर्नोग्राफी सर्च करणाऱ्यांवर पोलिसांची नजर असल्याचा इशारा दिला जात आहे. हा मेसेज सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून यात पुढील वेळी पुन्हा अश्लील व्हिडीओ पाहिल्यास कायदेशीर कारवाई केली असं त्यात नमूद करण्यात आलं आहे. हिंदी भाषेसोबतच पदेशी भाषांसोबत हा मेसेज व्हायरल होत आहे. उत्तर प्रदेशात ही घटना समोर आली आहे. 

दरम्यान, या व्हायरल मेसेजवर १०९० च्या एडीजी नीरा रावत यांनी तपासाचे आदेश दिले आहे. चाईल्ड पॉर्न संबंधी इंटरनेटवर माहिती सर्च करणाऱ्या लोकांना पॉप अप मेसेजद्वारे इशारा दिला जाणार आहे. परंतु काही लोकं जाणूनबुजून याचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसत आहे, असं रावत म्हणाल्या. तसंच या प्रकरणी कारवाई केली जाणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं. 

१२ फेब्रुवारी रोजी १०९० कडून डिजिटल आऊटरिच प्रोग्राम 'हमारी सुरक्षा' या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला होता. यामध्ये महिला आणि लहान मुलांच्या सुरक्षेसाठी एक रोडपॅम सादर करण्यात आला होता. तसंच १०९० डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून माहिती देऊन महिला आणि लहान मुलांना सुरक्षिततेचे धडे देण्याचं यामागचा उद्देश आहे.

कार्यक्रमाच्या वेळी काय म्हणाल्या होत्या रावत?

"इंटरनेटचा वाढता वापर पाहता १०९० नं लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी याच माध्यमाचा वापर केला. उत्तर प्रदेशात डिजिटल चक्रव्ह्यू (महिला सुरक्षेसाठी ३६० डिग्री इकोसिस्टम) साठी एक डिजिटल आऊटरिच रोडमॅप तयार केला आहे," अशी माहिती १०९० मध्ये आयोजित एका कार्यक्रमात एडीजी नीरा रावत यांनी दिली होती. "सुरुवातीला पायलट प्रोजेक्ट अंतर्गत राज्यातील सहा जिल्ह्यांमध्ये ही योजना सुरू करण्यात आली होती. यामध्ये चांगल्या प्रकारे आम्हाला प्रतिसाद मिळाला. आता राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये हे सुरू करण्यात येईल. राज्यात जवळपास ११.६ कोटी इंटरनेट युझर्स आहेत. मुख्य रूपानं ते सर्वच १०९० च्या टार्गेटमध्ये आहेत. महिलांच्या फेसबुक, ट्विटर आणि इन्स्टाग्राम आयडीवर सुरक्षेशी निगडीत मेसेज आणि तरूणांना इशारा देणारा मेसेज पाठवण्यात येणार आहे," असंही त्या म्हणाल्या होत्या.

"या संपूर्ण योजनं नाव आमची सुरक्षा असं ठेवण्यात आलं आहे. या अंतर्गत सर्व इंटनेट युझर्सपर्यंत पोहोचण्याचं लक्ष्य ठेवण्यात आलं आहे. टप्प्याटप्प्यानं ही योजना संपूर्ण राज्यात लागू करण्यात येणार आहे. १०९० ही सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर असेल आणि निरनिराळ्या सोशल मीडिया युझर्सपर्यंत याबाबत माहिती पोहोचवली जाईल. सोशल मीडियावरू पाठवण्यात येणारे संदेशही तयार करण्यात आले आहेत," असंही त्यांनी सांगितलं होतं.

Web Title: know the truth of polices viral sms for internet child porn searchers uttar pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.