"मुली स्वतःहून संबंध ठेवतात अन् ब्रेकअपनंतर बलात्काराच्या तक्रारी करतात"

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2020 10:23 AM2020-12-13T10:23:12+5:302020-12-13T10:39:04+5:30

Kiranmayee Nayak : "अल्पवयीन असणाऱ्या मुलींना माझा सल्ला आहे की, कोणत्याही फिल्मी रोमान्सच्या जाळ्यात फसू नका. तुमचं कुटुंब आणि पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं."

kiranmayee nayak says girls after establishing consensual relationship and break up file for rape complaint | "मुली स्वतःहून संबंध ठेवतात अन् ब्रेकअपनंतर बलात्काराच्या तक्रारी करतात"

"मुली स्वतःहून संबंध ठेवतात अन् ब्रेकअपनंतर बलात्काराच्या तक्रारी करतात"

Next

नवी दिल्ली - देशात महिलांवरील अत्याचाराच्या, बलात्काराच्या घटना या सातत्याने समोर येत आहेत. याच दरम्यान छत्तीसगड राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांनी एक वादग्रस्त विधान केलं आहे. "बहुतांश मुली या आधी स्वतःहून संबंध ठेवतात आणि ब्रेकअपनंतर पुरुषांवर बलात्कार केल्याचा आरोप करतात" असं विधान महिला आयोगाच्या अध्यक्षा किरणमयी नायक यांनी केलं आहे. त्यांच्या या विधानामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. 

"जर एखादी विवाहित व्यक्ती एखाद्या मुलीसोबत विवाहबाह्य संबंध ठेवत असेल तर अशावेळी मुलींनी हे बघायला हवं की ती व्यक्ती त्यांना जगण्यासाठी मदत करणार आहे की नाही. मात्र जेव्हा त्यांचे असे हे संबंध तुटतात तेव्हा बहुतांश घटनांमध्ये महिला पोलीस ठाण्यात धाव घेतात" असं नायक यांनी म्हटलं आहे. छत्तीसगडमधील बिलासपूरमध्ये महिलांवरील अत्याचाराबाबत माध्यमांशी संवाद साधत असताना असं म्हटलं आहे.

"लिव्ह इन रिलेशनशिप संपते तेव्हा बलात्काराचे गुन्हे दाखल केले जातात"

किरणमयी नायक यांनी "बहुतांश घटना अशा आहेत की लिव्ह इनमध्ये राहून सहमतीने संबंध ठेवल्यानंतरही मुली बलात्काराच्या तक्रारी दाखल करतात. मी महिला/मुलींना आवाहन करते की, त्यांनी आधी नातं समजून घ्यावं. जर तुम्ही अशा प्रकारच्या नातेसंबंधांमध्ये आहात, त्याचा परिणाम वाईटच होईल. सहमतीने संबंध ठेवल्यानंतर नातं तुटल्यानंतरच्या अनेक घटना आहेत. लिव्ह इन रिलेशनशिप संपते तेव्हा बलात्काराचे गुन्हे दाखल केले जातात" असं म्हटलं आहे.

"कोणत्याही फिल्मी रोमान्सच्या जाळ्यात फसू नका"

"अल्पवयीन असणाऱ्या मुलींना माझा सल्ला आहे की, कोणत्याही फिल्मी रोमान्सच्या जाळ्यात फसू नका. तुमचं कुटुंब आणि पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं. सध्या 18 व्या वर्षीच लग्न करण्याचं प्रमाण वाढलं आहे. पुढे काही वर्षानंतर जेव्हा मुलं होतात, तेव्हा दाम्पत्याला सोबत राहणं अवघड होत आहे. जास्तीत जास्त कौटुंबिक वाद सोडण्याचे आयोगाचे प्रयत्न आहेत. त्यामुळेच आम्ही महिला व पुरुषांना त्यांच्या चुकांवरून समज देत असतो. त्यांनी मार्ग काढावा यासाठी प्रयत्न करतो. समुपदेशन हाच मार्ग आहे" असंही देखील महिला आयोगाच्या अध्यक्षांनी म्हटलं आहे. 

Web Title: kiranmayee nayak says girls after establishing consensual relationship and break up file for rape complaint

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.