आणीबाणीच्या माध्यमातून लोकशाहीची हत्या; पंतप्रधानांनी जागवल्या आठवणी 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2019 10:21 AM2019-06-25T10:21:33+5:302019-06-25T10:22:22+5:30

देशाची अखंडता कायम ठेवण्यासाठी नेहमी आणीबाणीच्या परिस्थितीची आठवण असणं गरजेचे आहे.

Killing of democracy through emergency; PM remembers waking memories | आणीबाणीच्या माध्यमातून लोकशाहीची हत्या; पंतप्रधानांनी जागवल्या आठवणी 

आणीबाणीच्या माध्यमातून लोकशाहीची हत्या; पंतप्रधानांनी जागवल्या आठवणी 

Next

नवी दिल्ली- देशातील लोकशाहीच्या इतिहासातील काळा दिवस म्हणून आणीबाणीचा दिवस ओळखला जातो. 25 जून 1975 रोजी देशात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी घोषित केली होती. आज आणीबाणीच्या घोषणेला 44 वर्ष पूर्ण झाले आहेत. आणीबाणी विरोधात पंतप्रधानांसह भाजपाच्या अनेक मंत्र्यांनी ट्विट करत या घटनेचा निषेध केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणीबाणीच्या विरोधातील एक व्हिडीओ ट्विट केला आहे तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राजकीय स्वार्थासाठी देशातील लोकशाहीची हत्या केली असं ट्विटमध्ये लिहिलं आहे. 

तर केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आणीबाणीवर ट्विट करताना लिहिलं आहे की, देशाची अखंडता कायम ठेवण्यासाठी नेहमी आणीबाणीच्या परिस्थितीची आठवण असणं गरजेचे आहे. पंतप्रधानांनी व्हिडीओ पोस्ट केला आहे त्यात संसदेत आणीबाणीवर पंतप्रधानांनी केलेल्या भाषणाचा काही भागही दाखविण्यात आला आहे. 


केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी ट्विट केलं आहे. यात त्यांनी लिहिलं आहे की, 1975 मध्ये आजच्याच दिवशी आपल्याला राजकीय फायद्यासाठी देशातील लोकशाहीची हत्या करण्यात आली होती. देशातील नागरिकांचे मुलभूत हक्क हिरावून घेतले होते. वृत्तपत्रांवर टाळे लावले होते. लाखो देशभक्तांना देशात पुन्हा लोकशाही आणण्यासाठी नरकयातना सहन कराव्या लागल्या होत्या. त्या सर्वांना मी नमन करतो असं शहांनी लिहिलं आहे. 


तर केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे की, 25 जून 1975 रोजी आणीबाणीची घोषणा भारताच्या इतिहासातील सर्वांत गंभीर घटनांमधील एक घटना आहे. देशातील प्रत्येक नागरिकाला आपल्या संस्था आणि संविधानाला अखंड ठेवण्यासाठी अशा घटनांना आठवणीत ठेवणे गरजेचे आहे. 


संरक्षण मंत्र्यासोबत अनेक मंत्र्यांनी यावर ट्विट केलं आहे. केंद्रीय क्रीडा मंत्री किरण रिजिजू यांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे की, मी माझा वेळ देशाच्या स्वतंत्र्यासाठी समर्पित करतो. कारण 25 जून 1975 च्या रात्री भारतात आणीबाणीची घोषणा करण्यात आली होती. त्यावेळी लोकशाहीची हत्या झाली. रिजिजू यांनी ट्विटमध्ये त्यावेळच्या वृत्तपत्राचं छायाचित्र पोस्ट केलं आहे. 



 

Web Title: Killing of democracy through emergency; PM remembers waking memories

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.