‘नीती आयोगा’च्या निर्देशांकात केरळ, हिमाचल, आंध्रची बाजी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2019 01:56 AM2019-12-31T01:56:45+5:302019-12-31T01:57:43+5:30

नीती आयोगाच्या ‘एसडीजी इंडिया निर्देशांक २0१९’ मध्ये केरळ, हिमाचल प्रदेश आणि आंध्र प्रदेश ही राज्ये आघाडीची ‘परफॉर्मिंग स्टेटस्’ ठरली आहेत.

Kerala, Himachal, Andhra in the 'Policy Commission' index | ‘नीती आयोगा’च्या निर्देशांकात केरळ, हिमाचल, आंध्रची बाजी

‘नीती आयोगा’च्या निर्देशांकात केरळ, हिमाचल, आंध्रची बाजी

Next

नवी दिल्ली : नीती आयोगाच्या ‘एसडीजी इंडिया निर्देशांक २0१९’ मध्ये केरळ, हिमाचल प्रदेश आणि आंध्र प्रदेश ही राज्ये आघाडीची ‘परफॉर्मिंग स्टेटस्’ ठरली आहेत. या निर्देशांकात सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरणीय निकषांवर राज्यांचे मूल्यमापन करण्यात येते.
नीती आयोगाने जारी केलेल्या अहवालानुसार, यंदाच्या शाश्वत विकास उद्दिष्ट (एसडीजी) निर्देशांकात बिहार, झारखंड आणि अरुणाचल प्रदेश यांची कामगिरी सर्वात वाईट ठरली. नीती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत यांनी ‘एसडीजी इंडिया निर्देशांक २0१९’ जारी केला. त्यावेळी त्यांनी सांगितले की, संयुक्त राष्ट्रांनी २0३0 पर्यंतची एसडीजी लक्ष्ये आहेत. ही लक्ष्ये भारताशिवाय पूर्ण केली जाऊ शकत नाहीत.
अहवालानुसार, उत्तर प्रदेश, ओडिशा, सिक्किम यांनी कमाल सुधारणेचे प्रदर्शन केले आहे. गुजरातने २0२८ च्या तुलनेत मानांकनात कोणतीही सुधारणा केली नाही. भारताच्या गुणांत वाढ झाली आहे. २0१८ मध्ये भारताचे गुण ५७ होते. २0१९ मध्ये ते वाढून ६0 झाले आहेत.

लक्ष्यांचे वास्तवकालीन मोजमाप करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी ठरविलेल्या ३0६ संकेतकांपैकी (इंडिकेटर्स) १00 संकेतकांचा नीती आयोग आपल्या निर्देशांकासाठी वापर करतो. शाश्वत विकासासाठी संयुक्त राष्ट्रांनी १७ लक्ष्ये (गोल), १६९ उद्दिष्ट (टार्गेट) आणि ३0६ संकेतक (इंडिकेटर) ठरविले आहेत.

Web Title: Kerala, Himachal, Andhra in the 'Policy Commission' index

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.