Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2025 10:51 IST2025-06-15T10:35:19+5:302025-06-15T10:51:23+5:30
Kedarnath Helicopter Crash : केदारनाथ यात्रा मार्गावर हेलिकॉप्टर कोसळले, यामध्ये अनेक प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
Kedarnath Helicopter Crash : उत्तराखंडमधील केदारनाथ धामजवळ आज एक हेलिकॉप्टर कोसळले. या अपघातात हेलिकॉप्टरमधील सर्व लोकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे, यामध्ये एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या तुकड्या घटनास्थळी आहेत. दरम्यान, आता हेलिकॉप्टर सेवेबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या अपघातावर उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे.
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
गौरीकुंडला जाणारे हेलिकॉप्टर कोसळले, याचा परिणाम आता चारधाम यात्रेच्या हेलिकॉप्टर सेवेवरही झाला आहे. अपघातानंतर लगेचच हेलिकॉप्टर सेवा स्थगित करण्याचे आदेश देण्यात आल. पुढील आदेश येईपर्यंत हा आदेश पाळला जाईल. मिळालेल्या माहितीनुसार, अपघाताचे बळी ठरलेले प्रवासी उत्तराखंड, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरातमधील आहेत.
Uttarakhand | A helicopter going from Dehradun to Kedarnath has gone missing in Gaurikund. The helicopter went missing between Trijuginarayan and Gaurikund: Uttarakhand ADG Law and Order, Dr V Murugeshan
— ANI (@ANI) June 15, 2025
मुख्यमंत्र्यांनी दिले आदेश
उत्तराखंडमधील वाढत्या हेलिकॉप्टर अपघातांच्या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी कडक आदेश दिले आहेत. ते म्हणाले की, 'राज्यात हेली सेवांच्या संचालनासाठी एक कठोर एसओपी तयार करावी, यामध्ये उड्डाण करण्यापूर्वी हेलिकॉप्टरची तांत्रिक स्थिती पूर्णपणे तपासली पाहिजे.' याशिवाय, हवामानाची अचूक माहिती असणे देखील बंधनकारक करावे. मुख्यमंत्री धामी यांनी मुख्य सचिवांना तांत्रिक तज्ञांची एक समिती स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. ही समिती हेली ऑपरेशन्सच्या सर्व तांत्रिक आणि सुरक्षिततेच्या पैलूंचा आढावा घेतल्यानंतर एसओपी तयार करेल.
पायलटसह सात जणांचा मृत्यू
केदारनाथमध्ये पुन्हा हेलिकॉप्टर अपघाताची भीषण घटना समोर आली आहे. उत्तराखंडमधील केदारनाथ धाममध्ये आज सकाळी एक हेलिकॉप्टर कोसळले. गौरीकुंड परिसरातील त्रिजुगीनारायण नारायणजवळ हा अपघात झाला. अपघातग्रस्त हेलिकॉप्टर आर्यन कंपनीचे होते आणि ते केदारनाथ धामहून फाटा येथे जात होते. या अपघातात हेलिकॉप्टरमधील सर्व ७ जणांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफ आणि एनडीआरएफच्या टीम घटनास्थळी पोहोचल्या आहेत. मृतांमध्ये महाराष्ट्राती भाविकांचाही समावेश आहे.
सकाळी ०५:१७ वाजता, आर्यन कंपनीचे हेलिकॉप्टरने केदारनाथ हेलिपॅडवरून गुप्तकाशीसाठी ६ भाविक आणि पायलटसह उड्डाण केले. खराब हवामानामुळे, हेलिकॉप्टर लँडिंग करताना कोसळले. या हेलिकॉप्टरमध्ये पायलटसह ७ जण विमानात होते. हेलिकॉप्टरमध्ये राजवीर (पायलट), विक्रम रावत, विनोद, तृष्टी सिंह, राजकुमार, श्रद्धा आणि राशी (वय १० वर्षे) असे प्रवासी होते. केदारनाथ येथे दाट धुके आणि जोरदार वाऱ्यामुळे हेलिकॉप्टर रस्ता चुकले. त्यानंतर हेलिकॉप्टरचा संपर्क तुटला आणि गौरीकुंडच्या जंगलात ते कोसळल्याचे म्हटलं जात आहे.