काश्मिरी तरुण दहशतवाद्यांना सामील; व्हिसा घेऊन पाकिस्तानात गेलेले १०० हून अधिक तरुण बेपत्ता

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2021 05:32 AM2021-02-08T05:32:23+5:302021-02-08T07:29:23+5:30

स्लीपर सेल म्हणून सक्रिय झाल्याची भीती

Kashmiri youth join terrorism | काश्मिरी तरुण दहशतवाद्यांना सामील; व्हिसा घेऊन पाकिस्तानात गेलेले १०० हून अधिक तरुण बेपत्ता

काश्मिरी तरुण दहशतवाद्यांना सामील; व्हिसा घेऊन पाकिस्तानात गेलेले १०० हून अधिक तरुण बेपत्ता

Next

श्रीनगर : पाकिस्तानात व्हिसा घेऊन गेलेले सुमारे १०० हून अधिक काश्मिरी तरुण बेपत्ता झाल्याने सुरक्षा यंत्रणांनी धाेक्याचा इशारा दिला आहे. हे तरुण सीमेपलीकडून देशविघातक कारवाया करणाऱ्या दहशतवादी संघटनांचे स्लीपर सेल म्हणून काम करीत असल्याची भीती सुरक्षा यंत्रणांनी व्यक्त केली आहे.

गेल्या वर्षी एप्रिलमध्ये हंडवारा येथील जंगलात उडालेल्या चकमकीत ५ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला हाेता. त्यापैकी एक तरुण काश्मीरचाच रहिवासी हाेता. ताे २०१८ मध्ये अल्प काळासाठी पाकिस्तानात गेला हाेता. त्यानंतर ताे परतलाच नव्हता, अशी माहिती सुरक्षा यंत्रणांनी त्यावेळी दिली हाेती. 

गेल्या वर्षी १ ते ६ एप्रिल या कालावधीत शाेपियान, कुलगाम आणि अनंतनाग जिल्ह्यातील अनेक तरुण घुसखाेरी करणाऱ्या दहशतवाद्यांसाेबत आढळले हाेते. ते सर्व जण याेग्य कागदपत्रांसह पाकिस्तानात गेले हाेते. मात्र, परतलेच नव्हते. 

पाकिस्तानात गेलेले अनेक तरुण एक तर परतलेच नाहीत किंवा परतल्यानंतर बेपत्ता झाले. ते पाकिस्तानी गुप्तचर संस्था ‘आयएसआय’च्या इशाऱ्यावर स्लीपर सेल्स म्हणून काम करीत असल्याचा संशय आहे. (वृत्तसंस्था)

पाकिस्तानातून परतलेल्यांच्या चाैकशीतून माहिती उघड
बेपत्ता असलेले तरुण काश्मिरातील मध्यमवर्गीय कुटुंबातील आहेत. नियंत्रण रेषेवर वाढविण्यात आलेल्या बंदाेबस्तामुळे स्फाेटके व इतर साहित्य न पाेहाेचल्यामुळे ते सध्या शांत बसले आहेत. 
सुरक्षा यंत्रणांनी दाेन वर्षांपूर्वी पाकिस्तानातून परतलेल्यांची चाैकशीही केली हाेती. त्यातून धक्कादायक माहिती उघड झाली आहे. दहशतवादी संघटनांनी तरुणांचे माेठ्या प्रमाणावर ब्रेनवाॅश करून तरुणांची भरती केली. त्यांच्यासाठी ६ आठवड्यांचे प्रशिक्षणही हाेते. काही तरुणांना सहज उपलब्ध असलेल्या साहित्यापासून बाॅम्ब बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आल्याचा दाट संशय सुरक्षा यंत्रणांनी व्यक्त केला आहे.

Web Title: Kashmiri youth join terrorism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.