Karnataka Trust Vote, Political Crisis and Floor Test Live Updates in Marathi | Karnataka Trust Vote Live Update: आजच होणार कुमारस्वामी सरकारची बहुमत चाचणी, विधानसभा अध्यक्षांची घोषणा
Karnataka Trust Vote Live Update: आजच होणार कुमारस्वामी सरकारची बहुमत चाचणी, विधानसभा अध्यक्षांची घोषणा

बंगळुरु - कर्नाटकातील राजकीय नाट्यानंतर आज विधानसभेत मुख्यमंत्री कुमारस्वामी यांना बहुमत सिद्ध करावं लागणार आहे. 15 बंडखोर आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर काँग्रेस-जेडीएस सरकार संकटात आलं. काँग्रेस-जेडीएसचा दावा आहे की, त्यांच्याकडे सरकार चालविण्यासाठी पुरेसे बहुमत आहे. मात्र सरकारकडे 100 आमदारांचे पाठबळ आहे तर आमच्याकडे 107 आमदार आहेत असा दावा भाजपाच्या नेत्यांनी केला आहे. त्यामुळे सरकार वाचविण्यासाठी कुमारस्वामी यांना अग्निपरीक्षेला तोंड द्यावं लागणार आहे. 

कुमारस्वामी सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी आणखी दोन दिवसांचा कालावधी मिळाला आहे. विधानसभा सभापती रमेश कुमार यांनी सोमवारपर्यंत विधानसभा स्थगित केल्याचं सांगितलं. 

LIVE

Get Latest Updates

03:48 PM

बंडखोर आमदार परत आल्यास आम्हालाच साथ देतील- सिद्धारमय्या

01:32 PM

ऑपरेशन लोटसच्या मागे भाजपाचाच हात, डी. के. शिवकुमार यांचा आरोप

11:04 AM

कर्नाटकच्या बंडखोर आमदारांनी उद्या 11 वाजेपर्यंत भेटावे; विधानसभा अध्यक्षांचे आदेश


10:49 AM

भाजपचे ज्येष्ठ नेते येडीयुराप्पा आमदारांसह विधानसभेत पोहोचले 

10:06 AM

बहुमत चाचणीसाठी विधानसभेकडे भाजपाचे आमदार लक्झरी बसमधून निघाले 

10:05 AM

बहुमत चाचणीआधी भाजपाच्य़ा आमदारांचा रामदा हॉटेलमध्ये सामुहिक योगा 

08:54 PM

कुमारस्वामींना दोन दिवसांची सवलत, सोमवारपर्यंत सभागृह तहकुब

कर्नाटकातील कुमारस्वामी सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी आणखी दोन दिवसांचा कालावधी मिळाला आहे. विधानसभा सभापती रमेश कुमार यांनी सोमवारपर्यंत विधानसभा स्थगित केल्याचं सांगितलं.  

05:50 PM

कुमारस्वामींची सुप्रीम कोर्टात धाव

बहुमत सिद्ध करण्यासाठी राज्यपालांनी लिहिलेल्या पत्राविरोधात मुख्यमंत्री कुमारस्वामींनी घेतली सुप्रीम कोर्टात धाव.

05:25 PM

मी बहुमत चाचणीचा निर्णय तुमच्याकडे (विधानसभा अध्यक्ष) सोपविला आहे. दिल्लीकडून निर्देश दिले जाऊ नयेत. मी आपल्याला विनंती करतो की राज्यपालांकडून आलेल्या पत्रापासून मला वाचवा - कुमारस्वामी

03:51 PM

सहापर्यंत बहुमत सिद्ध करा, राज्यपालांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

कर्नाटकचे राज्यपाल वजुभाई वाला यांनी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांना पत्र लिहून संध्याकाळी सहापर्यंत बहुमत सिद्ध करण्यास सांगितले आहे. 

03:31 PM

जनता दल (एस)चे आमदार श्रीनिवास गौडा यांनी विधानसभेत भाजपाने 5 कोटींची ऑफर दिल्याचे म्हटले होते. याप्रकरणी त्यांच्याविरोधात विशेषाधिकार हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल करण्यात येणार असल्याचे भाजपाचे नेते येडीयुराप्पा यांनी म्हटले आहे.

02:44 PM

20 आमदार नसल्याने मंगळवारीच बहुमत चाचणी होणार; सिद्धरामय्यांचा अंदाज 

02:00 PM

राज्यपालांची डेडलाईन पाळण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घ्यावा : विधानसभा अध्यक्ष

राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठविले आहे. त्य़ांनीच डेडलाईन पाळायची की नाही याचा निर्णय घ्यावा. पण बहुमत प्रसातावावरील चर्चा संपत नाही तोपर्यंत चाचणी घेऊ शकत नाही, असे विधानसभा अध्यक्षांनी स्पष्ट केले.  

01:58 PM

कर्नाटक विधानसभेचे कामकाज दुपारी 3 वाजेपर्यंत तहकूब 

01:57 PM

राज्यपालांनी दिलेली 1.30 वाजताची डेडलाईन संपली; कर्नाटकात चर्चाच सुरू

राज्यपाल वजूभाई वाला यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना दिलेली दुपारी 1.30 वाजेपर्यंत बहुमत सिद्ध करण्याची मुदत संपली असून ते अशी मुदत देऊ शकतात का, असा प्रश्नच मुख्यमंत्र्यांनी विधानसभा अध्यक्षांना विचारला होता.

  

12:46 PM

खुर्ची धोक्यात, तरीही भाजपाच्या आमदारांना नाश्ता घेऊन पोहोचले कर्नाटकचे उपमुख्यमंत्री

खुर्ची धोक्यात, तरीही भाजपाच्या आमदारांना नाश्ता घेऊन पोहोचले कर्नाटकचे उपमुख्यमंत्री

 

12:45 PM

आमदार श्रीमंत पाटील यांना भेटण्याची मुंबई पोलिसांनी दिली कर्नाटकच्या पोलिसांना परवानगी 

11:36 AM

विकले गेल्याच्या आरोपावरून विधानसभा अध्यक्ष व्यथित; सुनावली खरीखोटी 

11:14 AM

येडीयुराप्पा मुख्यमंत्री होण्यासाठी भाजपाच्या आमदार शोभा करंदलाजे चामुंडेश्वरी मंदिराच्या 1001 पायऱ्या चढल्या 

11:04 AM

कर्नाटक आमदारांच्या अपहरणाचा आरोप करत तृणमूल काँग्रेसने लोकसभेत दिला स्थगन प्रस्ताव 

10:40 AM

मुंबई पोलिसांसमवेत कर्नाटकचे पोलिस काँग्रेसच्या आजारी आमदाराला पहायला जॉर्ज हॉस्पिटलमध्ये आले 

09:57 AM

बहुमत चाचणीआधी भाजपा आमदारांची बोलावली बैठक 

09:56 AM

विधानसभेत धरणे आंदोलनाला बसलेल्या भाजप आमदारांची उप मुख्यमंत्री जी परमेश्वर यांनी भेट घेतली 

05:52 PM

भाजपाकडून घोडेबाजार होत असल्याचा आरोप; विधानसभेत गदारोळ 

05:23 PM

आजच बहुमत घ्या; येडियुरप्पांची मागणी 

03:33 PM

आमच्या आमदारांना सुरक्षित ठेवा- काँग्रेस नेते डी. के. शिवकुमार 

03:31 PM

मुख्यमंत्री कुमारस्वामींचे बंधू विधानसभेत अनवाणी पोहोचले 

02:25 PM

येडियुरप्पांच्या भाषणादरम्यान गोंधळ; विधानसभेचं कामकाज दुपारी ३ पर्यंत स्थगित

01:31 PM

येडियुरप्पा गैरसमज पसरविण्याचं काम करतायेत - काँग्रेस आमदार

बी एस येडियुरप्पा  हे देशाला आणि कोर्टाला चुकीची माहिती देत आहेत असा आरोप काँग्रेस आमदार डी. के शिवकुमार यांनी केला.  

12:47 PM

रामलिंगा रेड्डींवर संतापले बंडखोर आमदार

बंडखोर आमदार रामलिंगा रेड्डी यांनी राजीनामा मागे घेतल्याने इतर बंडखोर आमदार संतापले. रामलिंगा रेड्डी यांनी गद्दारी केल्याचा आरोप केला आहे. चर्चेदरम्यान रेड्डी यांनी राजीनामा मागे घेणार नसल्याचं सांगितले. मग अचानक त्यांना राजीनामा मागे घेऊन आमचा विश्वासघात केला आहे अशी प्रतिक्रिया मुंबईत असणाऱ्या बंडखोर आमदारांनी दिली. 

12:34 PM

काँग्रेस-भाजपा आमदारामध्ये खडाजंगी

विश्वासदर्शक ठरावावेळी भाजपा आणि काँग्रेस आमदारामध्ये खडाजंगी झाली. काँग्रेसकडून सिद्धारामय्या बोलण्यासाठी उभे राहिल्यानंतर भाजपा आमदारांनी त्यांना विरोध केला. यावरुन काँग्रेसचे डी.के शिवकुमार यांनी भाजपा आमदाराचा विरोध केला. विश्वासदर्शक ठरावावर विधानसभेत काँग्रेस-जेडीएसचे 26 आमदार बोलण्यासाठी उभे राहतील.  

11:59 AM

काँग्रेस आमदार श्रीमंत पाटील यांच्यावर मुंबईत उपचार, विश्वासदर्शक ठरावावेळी गैरहजर

काँग्रेस आमदार श्रीमंत पाटील काल रात्री उशीरा मुंबईतील रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेत. श्रीमंत पाटील यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केलंय  

11:38 AM

विश्वासदर्शक ठरावावर विधानसभेत चर्चा सुरु

मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी विश्वासदर्शक ठराव मांडला. सभागृहात ठरावावर चर्चा सुरु आहे. आमच्या सरकारवर प्रश्नचिन्ह उभं राहिल्याने मी याठिकाणी उभा आहे. काँग्रेस-जेडीएस सरकार अस्थिर करण्यामागे कोणाचा हात आहे? बी एस येडियुरप्पा यांना कशासाठी घाई लागली आहे? - कुमारस्वामी 

11:32 AM

कर्नाटक विधानसभेत नाट्यमय घडामोडी, बसपा आमदार गैरहजर

कर्नाटक विधानसभेतील विश्वासदर्शक ठरावावेळी नाट्यमय घडामोडी घडत आहेत. बहुजन समाज पार्टीचे आमदार एन महेश विधानसभेत गैरहजर आहेत. काँग्रेस-जेडीएस सरकारने मायावती यांच्याशी संपर्क केला नसल्याने मी माझ्या मतदारसंघात असल्याचं एन महेश यांनी सांगितले. तर दुसरीकडे बंडखोर आमदार रामलिंगा रेड्डी यांनी राजीनामा मागे घेऊन सरकारला पाठिंबा देत असल्याचं सांगितले. 

11:12 AM

कुमारस्वामी सरकार बहुमत सिद्ध करु शकणार नाही, 101 टक्के खात्री - येडियुरप्पा

आम्हाला 101 टक्के खात्री आहे की, कुमारस्वामी सरकार बहुमत सिद्ध करु शकणार नाही. त्यांच्याकडे 100 पेक्षा कमी आमदारांचा पाठिंबा आहे. भाजपाचे 105 आमदार आहे. त्यामुळे विश्वासदर्शक ठराव त्यांच्याविरोधात जाईल यात शंका नाही अशी प्रतिक्रिया भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बी.एस येडियुरप्पा यांनी दिली आहे.  

11:09 AM

भाजपा आणि काँग्रेस आमदार विधानभवनात दाखल

थोड्याच वेळात कर्नाटक विधानसभा विशेष अधिवेशनाला सुरुवात होईल. दोन बसमधून भाजपाचे आमदार विधानभवनात दाखल झाले आहेत. तसेच काँग्रेस आमदारही माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यासोबत विधानभवनात उपस्थित झालेत.  

11:06 AM

कर्नाटक विधानसभेत कुमारस्वामी सरकार विश्वासदर्शक ठराव मांडणार

कर्नाटक विधानसभेत आज विश्वासदर्शक ठराव मांडला जाणार आहे. काँग्रेस-जेडीएस सरकार कर्नाटकात सरकार टिकविणार का याकडे सगळ्यांचे लक्ष लागलं आहे.  

11:03 AM

मुख्यमंत्री कुमारस्वामी विधानभवनात दाखल

मुख्यमंत्री कुमारस्वामी कर्नाटक विधानभवनात दाखल झाले आहेत. सरकार वाचविण्यासाठी कुमारस्वामींना कसरत करावी लागणार आहे.  

English summary :
Karnataka Political Crisis Update: JDS also known as Janta Dal(Secular) coalition government which is led by Chief Minister HD Kumaraswamy, is facing its trust vote in the Karnataka Assembly today. Discussion started at 11 am today. After the resignation of rebel MLAs, the Congress-JDS government got in trouble.


Web Title: Karnataka Trust Vote, Political Crisis and Floor Test Live Updates in Marathi
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.