देशात 33 कोटी देवी-देवता, कोरोनाचा परिणाम होणार नाही; भाजप नेत्याचा अजब दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2020 02:22 PM2020-03-14T14:22:09+5:302020-03-14T14:32:00+5:30

याआधी भाजपच्या एका महिला नेत्याने कोरोना व्हायरसवर मात करण्यासाठी शेण आणि गोमुत्राचे सेवन करण्याचा सल्ला दिला होता. आता विजयवर्गीय यांनी अजब दावा केला आहे. 

kailash vijayvargiya said 33 crore deities in india no coronavirus effect | देशात 33 कोटी देवी-देवता, कोरोनाचा परिणाम होणार नाही; भाजप नेत्याचा अजब दावा

देशात 33 कोटी देवी-देवता, कोरोनाचा परिणाम होणार नाही; भाजप नेत्याचा अजब दावा

googlenewsNext

नवी दिल्ली - भारत देशात 33 कोटी देवी-देवता आहेत. त्यामुळे देशावर कोरोना व्हायरसचा काहीही परिणाम होणार नाही, असा अजब दावा भाजपचे राष्ट्रीय महासचिव कैलाश विजयवर्गीय यांनी केला. देशात सध्या कोरोना व्हायरसचे रूग्ण झपाट्याने वाढत आहेत. मात्र भाजप नेत्यांकडून यावर मात करण्यासाठी अजब वक्तव्य करण्यात येत आहेत.

विजयवर्गीय म्हणाले की, कोरोना व्हायरस आपलं काहीही बिघडवू शकत नाहीत. कारण आपल्याकडे हनुमानजी आहेत. त्यांचे नाव मी आता कोरोना पछाड हनुमान ठेवले आहे. मात्र सरकारी आदेशाचे पालन करावे लागत असून त्यामुळे बजरबट्टू संमेलन रद्द केल्याचे त्यांनी सांगितले.

कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रभावामुळे इंदोर शहरात आणि जिल्ह्यात रंगपंचमीच्या निमित्ताने काढण्यात येणारी मिरवणूक रद्द करण्यात आली आहे. तसेच येथे होणारे बजरबट्टू संमेलन देखील रद्द करण्यात आले. यावर विजयवर्गीय म्हणाले की,  आपल्या देशात 33 कोटी देवी-देवता निवास करतात. त्यामुळे येते कोरोनाचा काहीही परिणाम होणार नाही.

याआधी भाजपच्या एका महिला नेत्याने कोरोना व्हायरसवर मात करण्यासाठी शेण आणि गोमुत्राचे सेवन करण्याचा सल्ला दिला होता. आता विजयवर्गीय यांनी अजब दावा केला आहे. 
 

Web Title: kailash vijayvargiya said 33 crore deities in india no coronavirus effect

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.