Video: जेएनयूमध्ये विद्यार्थ्यांचा गोंधळ; अ‍ॅब्युलन्स रोखली

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2019 08:19 PM2019-10-28T20:19:44+5:302019-10-28T20:35:53+5:30

जवाहरलाल नेहरू विद्यापीठ आणि वाद हे जणू समीकरणच तयार झाले.

JNU students block ambulance for ailing professor during protest | Video: जेएनयूमध्ये विद्यार्थ्यांचा गोंधळ; अ‍ॅब्युलन्स रोखली

Video: जेएनयूमध्ये विद्यार्थ्यांचा गोंधळ; अ‍ॅब्युलन्स रोखली

Next

नवी दिल्ली : दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयू) सोमवारी विद्यार्थ्यांनी गोंधळ घातल्याचे वृत्त आहे. या विद्यापीठातील हॉस्टेलची फी आणि वीज बिल दरात वाढ केल्याच्या विरोधात विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरु केले आहे.

विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनामुळे विद्यापीठाचे डीन जगदीश कुमार आणि प्राध्यापक उमेश कदम यांची तब्येत बिघडली आहे. त्यांना उपचारांसाठी नेत असताना विद्यार्थ्यांनी अ‍ॅब्युलन्स रोखून धरली आणि घोषणाबाजी करत गोंधळ घातला. यावेळी विद्यार्थ्यांनी बराच वेळ अ‍ॅब्युलन्स रोखून धरली होती. दरम्यान, जेएनयू प्रशासनाने विद्यापीठातील हॉस्टेल आणि विजेच्या बिल दरात वाढ करण्यात आली आहे. ही वाढ रद्द करण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी करत आहेत. 

दरम्यान, जवाहरलाल नेहरू विद्यापीठ आणि वाद हे जणू समीकरणच तयार झाले. याआधी आपल्या विविध मागण्यांसाठी जेएनयू प्रशासनाविरोधात डाव्या संघटनेच्या विद्यार्थ्यांनी मार्च 2019 मध्ये सात दिवसांचे उपोषण केले होते. तसेच, विद्यार्थ्यांनी विद्यापीठीचे कुलगुरु एम. जमदीश कुमार यांच्या निवासस्थानी घेराव घातला होता. तर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांनी विरोध केला होता. 
 

Web Title: JNU students block ambulance for ailing professor during protest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.