PM मोदींच्या बैठकीपूर्वी काश्मीर खोऱ्यात दहशतवादी सक्रीय; एकाच दिवसात तीन हल्ले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2021 10:12 PM2021-06-23T22:12:46+5:302021-06-23T22:15:11+5:30

PM मोदींसोबत होणाऱ्या बैठकीच्या पूर्वसंध्येला काश्मीर खोऱ्यात दहशवादी सक्रीय झाल्याची माहिती मिळाली असून, दहशतवाद्यांनी एकाच दिवसांत तीन हल्ले केल्याचे समजते.

jk grenade attack at main chowk pulwama third attack in a day before pm modi meeting on kashmir | PM मोदींच्या बैठकीपूर्वी काश्मीर खोऱ्यात दहशतवादी सक्रीय; एकाच दिवसात तीन हल्ले

PM मोदींच्या बैठकीपूर्वी काश्मीर खोऱ्यात दहशतवादी सक्रीय; एकाच दिवसात तीन हल्ले

Next

श्रीनगर:जम्मू-काश्मीरच्या मुद्द्यावरून गुरुवार, २४ जून रोजी एक महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. पंतप्रधाननरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीला गृहमंत्री अमित शहांसह जम्मू-काश्मीरमधील सर्वपक्षीय नेते उपस्थित राहणार आहेत. मात्र, या बैठकीच्या पूर्वसंध्येला काश्मीर खोऱ्यात दहशवादी सक्रीय झाल्याची माहिती मिळाली असून, दहशतवाद्यांनी एकाच दिवसांत तीन हल्ले केल्याचे समजते. (jk grenade attack at main chowk pulwama third attack in a day before pm modi meeting on kashmir)

जम्मू काश्मीरच्या मुद्द्यावर होत असलेल्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर दहशतवादी सक्रीय झाले असून, काश्मीर खोऱ्यात तीन ठिकाणी सुरक्षादलांवर हल्ले केले आहेत. विशेष म्हणजे एकाच दिवशी हे तीनही हल्ले झाल्याची माहिती देण्यात आली आहे. दहशतवाद्यांनी पुलवामा येथील नाकाबंदी केलेल्या ठिकाणी ग्रेनेड हल्ला केला. तसेच यापूर्वी राजपोरा चौक आणि शोपियां भागातील श्रीमल येथे दहशतवद्यांनी जम्मू काश्मीर पोलीस तसेच सीआरपीएफ जवानांवर हल्ले केले. दहशतवाद्यांच्या या हल्ल्याला सुरक्षादलांकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आले आहे. 

जम्मू काश्मीरात ४८ तासांचा अलर्ट जारी

पंतप्रधान मोदी आणि जम्मू काश्मीरमधील नेत्यांच्या बैठकीपूर्वी एलओसीवर ४८ तासांचा हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यासोबतच हायस्पीड इंटरनेट सेवाही बंद ठेवल्या जाऊ शकतात, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. या बैठकीत सहभागी होण्यासाठी जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपी प्रमुख मेहबुबा मुफ्ती या श्रीनगरहून दिल्लीत पोहोचल्या आहेत. तसेच भाजपा अध्यक्ष रविंदर रैना आणि पक्षाचे नेते माजी उपमुख्यमंत्री कविंदर गुप्ताही दिल्लीत दाखल झाल्याचे सांगितले जात आहे. 

गुपकार संघटनेची बैठक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीपूर्वी मंगळवारी श्रीनगरमध्ये गुपकार संघटनेची बैठक झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावलेल्या बैठकीत सहभागी होणार आहोत, असे फारूक अब्दुल्ला यांनी स्पष्ट केले.  गुपकार संघटनेचा जो अजेंडा आहे तोच यापुढे कायम राहील, असेही ते म्हणाले. दरम्यान, जम्मू काश्मीरमध्ये कलम ३७०, ३५ ए हटवल्यानंतर केंद्र सरकारनं राज्यातील नेत्यांसोबत संवाद करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
 

Web Title: jk grenade attack at main chowk pulwama third attack in a day before pm modi meeting on kashmir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.