एका लग्नाची गोष्ट! तरुणाचं दोन मुलींवर प्रेम जडलं, एकाच मंडपात दोघींसोबत लग्न केलं; मुलं होती साक्षीदार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2021 04:19 PM2021-10-05T16:19:16+5:302021-10-05T16:20:45+5:30

Strange Love Story : लग्न होण्याआधीच त्याला दोन्ही तरुणींपासून मुलंही झाली होती. हे प्रकरण पोलिसांतही गेलं होतं.

jharkhand strange love story 2 girls married same boy in same mandap | एका लग्नाची गोष्ट! तरुणाचं दोन मुलींवर प्रेम जडलं, एकाच मंडपात दोघींसोबत लग्न केलं; मुलं होती साक्षीदार

एका लग्नाची गोष्ट! तरुणाचं दोन मुलींवर प्रेम जडलं, एकाच मंडपात दोघींसोबत लग्न केलं; मुलं होती साक्षीदार

Next

नवी दिल्ली - प्रेमासाठी अनेक जण वाटेल ते करतात. अशाच काही हटके गोष्टी या सातत्याने समोर येत असतात. सध्या अशाच एका लग्नाची जोरदार चर्चा रंगली आहे. एका तरुणाने एकाच वेळी दोन तरुणींशी एकाच मंडपात लग्न केल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. सर्वांसमोर नातेवाईकांच्या उपस्थितीत या तरुणाचा विवाह सोहळा पार पडला. विशेष म्हणजे या तरुणाची मुलं देखील या खास लग्न सोहळ्याला हजर होती. मिळालेल्या माहितीनुसार, झारखंडच्या लोहरदगा भागात संजीत उरांव नावाच्या तरुणाचं एकाचवेळी दोन तरुणींवर प्रेम होतं. 

लग्न होण्याआधीच त्याला दोन्ही तरुणींपासून मुलंही झाली होती. हे प्रकरण पोलिसांतही गेलं होतं. पण यावर कोणताही कायदेशीर तोडगा निघत नव्हता. अखेर गावच्या पंचायतीत  तरुणाने या दोन्ही तरुणींसोबत लग्न करावं असं ठरलं. त्यानंतर तरुणाचं दोन तरुणांसोबत थाटामाटात लग्न लावण्यात आलं. संजीतचं रिंकी नावाच्या तरुणीवर गेल्या अनेक वर्षांपूर्वी प्रेम जडलं होतं. लग्न होण्यापूर्वीच या जोडप्याला तीन मुलं झाली होती. तर तीन वर्षांपासून संजीतचं कलावती नावाच्या तरुणीसोबतही प्रेमप्रकरण सुरू होतं. 

तिघांचं लग्न लावण्याचा निर्णय

कलावती पासून देखील त्याला एक मुलगा होता. पण संजीत दोघींपैकी एकीसोबत लग्न करण्याचा पर्याय निवडायला तयार नव्हता आणि दोघींनाही मुलं असल्यामुळे आपलं संजीतशी लग्न व्हावं, यासाठी त्या आग्रही होत्या. अखेर या तिघांचं लग्न लावण्याचा निर्णय पंचायतीत घेण्यात आला. संजीतचं दोघींवरही प्रेम असल्यामुळे आणि दोघींनाही संजीतपासून मुलं असल्याने हा विवाह करण्याचा निर्णय घेतल्याचं ग्रामस्थांनी सांगितलं आहे. 

आईवडिलांच्या लग्नाला तिघांचीही चार मुलं उपस्थित

आपल्या आईवडिलांच्या लग्नाला तिघांचीही चार मुलं उपस्थित होती आणि एकमेकांसोबत खेळत धमाल करत होती. नवऱ्याच्या प्रेमप्रकरणाची माहिती झाल्यानंतर या दोघींमध्ये मोठा वाद ही झाला होता. हे प्रकरण पोलीस ठाण्यात देखील गेलं होतं. त्यानंतर आता या अनोख्या लग्नामुळे वादाला पूर्णविराम मिळाला आहे. सर्वांच्या उपस्थितीत खास करून मुलांच्या हजेरीत पार पडलेल्या या हटके विवाह सोहळ्याची चर्चा सर्वत्र रंगली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 


 

Web Title: jharkhand strange love story 2 girls married same boy in same mandap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app