हृदयद्रावक! आधी पतीचा मृत्यू; मग घरही गेलं, ७५ वर्षीय आजींवर आली शौचालयात राहण्याची वेळ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2020 10:44 AM2020-09-06T10:44:17+5:302020-09-06T10:53:08+5:30

या आजी आपलं उरलं सुरलं आयुष्य शौचालयाच्या चार भिंतीच्या आत जगत आहेत.

Jharkhand koderma swachh bharat mission toilets older women home stay age 75 years help | हृदयद्रावक! आधी पतीचा मृत्यू; मग घरही गेलं, ७५ वर्षीय आजींवर आली शौचालयात राहण्याची वेळ

हृदयद्रावक! आधी पतीचा मृत्यू; मग घरही गेलं, ७५ वर्षीय आजींवर आली शौचालयात राहण्याची वेळ

Next

स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत अनेक गावांमध्ये शौचालयं उभारण्यात आली आहेत. पण शौचालयातच आपलं घर तयार केल्याची घटना तुम्ही याआधी कधीही ऐकली नसेल. झारखंडमधून एका धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ७५ वर्षाच्या आजींवर नाईलाजाने शौचालयात राहण्याची वेळ आली आहे. या आजी आपलं उरलं सुरलं आयुष्य शौचालयाच्या चार भिंतीच्या आत जगत आहेत.  झारखंडच्या कोडरमाच्या डोमचांच भागातील  रहिवासी असलेल्या या आजींनी स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत तयार करण्यात आलेल्या शौचालयाला आपलं घरं बनवलं आहे. 

एक वृद्ध मजबूर महिला ने शौचालय बनाया अपना आशियाना.

झारखंडची राजधानी रांचीपासून १६५ किलोमीटर अंतरावर कोडरमा जिल्हा आहे.  या जिल्ह्यातील एका गावात मागिल दोन महिन्यांपासून या आजी शौचालयात राहत आहे. या आजींचे नाव दुखिया देवी आहे. उपायुक्त रमेश घोलप यांनी या महिलेला सरकारी योजनांबाबत अधिक माहिती  घेण्यास सांगितले आहे. पतीचा मृत्यू झाल्यानंतर या आजी एकट्याच मातीच्या घरात राहत  होत्या. पावसामुळे मातीचं राहतं घर पूर्णपणे कोलमडून पडल्यानं त्यांना राहण्यासाठी कोणतीही जागा शिल्लक नव्हती. नाईलाजाने त्यांनी तीन बाय चारच्या शौचालयात आपलं विश्व निर्माण केलं. 

एक वृद्ध मजबूर महिला ने शौचालय बनाया अपना आशियाना.

या आजींच्या आयुष्यात समस्यांचे सत्र सुरूच आहे. शौचालयाच्या घरात पावसाळ्यात पाणी शिरतं. त्यामुळे आजींना त्या घरातही धड राहता येत नाही. पंचायतीतील प्रमुखांना या आजींच्या स्थितीबाबत कल्पना आहे. तरीही आतापर्यंत कोणतीही मदत देण्यात आलेली नाही.  माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार या आजींच्या राहण्याची व्यवस्था करण्याबाबत उपायुक्तांनी  आदेश दिले आहेत. उपायुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार या आजींना सरकारी योजनांअंतर्गत निवारा उपलब्ध करून दिला जाईल. पण एवढ्याश्या जागेत खाणं पिणं, झोपणं, २४ तास तिथेच राहणं या वयात आजी कशा सहन करत असतील. या घटनेनं अनेकांना अस्वस्थ केलं आहे.  प्रशासन या आजींना राहण्यासाठी कोणती व्यवस्था करतं याकडे अनेकांचे लक्ष आहे. 

हे पण वाचा-

शाब्बास पोरा! १० वी च्या पोरानं भंगारापासून बनवली भन्नाट बाईक; नेटिझन्सना आठवलं पबजी....

वाह रे पठ्ठ्या! लॉकडाऊनमुळे गावाची वाट धरली; अन् ३ महिन्यात दीड लाखाची कमाई केली

Web Title: Jharkhand koderma swachh bharat mission toilets older women home stay age 75 years help

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.