Jawans encircle terrorists in Bandipur; One killed in a skirmish | बंदीपुरामध्ये जवानांनी दहशतवाद्यांना घेरले; चकमकीत एक ठार
बंदीपुरामध्ये जवानांनी दहशतवाद्यांना घेरले; चकमकीत एक ठार

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरच्या बंदीपुरामध्ये भारतीय जवानांनी चकमकीदरम्यान एका दहशतवाद्याला ठार केले आहे. तर अन्य दोन दहशतवाद्यांना घेरले आहे. 


रविवारी सकाळी जवानांनी दहशतवादी लपल्याच्या संशयातून शोधमोहिम राबविली होती. यावेळी जवानांना पाहून दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. याला जवानांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. यामध्ये एका दहशतवाद्याला ठार करण्यात आले. 


पोलिसांनी सांगितले की, दहशतवाद्यांबाबत समजताच जवानांनी परिसराला वेढा घातला. यानंतर शोधमोहिम राबविण्यात आली होती. दहशतवाद्यांनी त्यांच्यवर गोळीबार करण्यास सुरूवात केली. या चकमकीमध्ये कोणीही जखमी झालेले नाही. जवानांची कारवाई सुरूच आहे. 

Web Title: Jawans encircle terrorists in Bandipur; One killed in a skirmish

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.