BREAKING: जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये दहशतवाद्यांचा हल्ला, दोन पोलीस शहीद; तीन नागरिकांचा मृत्यू!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2021 01:58 PM2021-06-12T13:58:52+5:302021-06-12T13:59:55+5:30

जम्मू-काश्मीरच्या सोपोर येथे आणखी एका दहशतवादी हल्ल्याची माहिती समोर आली आहे. सोपोर जिल्ह्याच्या आरामपोरा नाक्यावर दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या तुकडीवर हल्ला केला.

Jammu Kashmir terrorists attack joint team of police and crpf at naka in sopore | BREAKING: जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये दहशतवाद्यांचा हल्ला, दोन पोलीस शहीद; तीन नागरिकांचा मृत्यू!

BREAKING: जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये दहशतवाद्यांचा हल्ला, दोन पोलीस शहीद; तीन नागरिकांचा मृत्यू!

Next

जम्मू-काश्मीरच्या सोपोर येथे दहशतवादी हल्ल्याची माहिती समोर आली आहे. सोपोर जिल्ह्याच्या आरामपोरा नाक्यावर दहशतवाद्यांनी सीआरपीएफ आणि पोलिसांच्या संयुक्त तुकडीवर हल्ला केला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार या हल्ल्यात दोन पोलीस कर्मचारी शहीद झाले असून तीन स्थानिक नागरिक देखील मृत्यूमुखी पडले आहेत. तर दोन पोलीस कर्मचारी गंभीररित्या जखमी झाले आहेत. काश्मीरचे आयजी विजय कुमार यांनी या हल्ल्यामागे लष्कर-ए-तैयबाचा हात असल्याचं म्हटलं आहे. 

एका अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी सीआरपीएफमधून मोठी मोहिम हाती घेण्यात आली असून संपूर्ण परिसरात नाकाबंदी करण्यात आली आहे. तर मोठ्या प्रमाणात झाडाझडती सुरू करण्यात आली आहे. याआधी जम्मू-कश्मीरच्या शोपिंया जिल्ह्यात शुक्रवारी देखील दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार केला होता. दक्षिण काश्मीरच्या जैनपोरा येथे दहशतवाद्यांनी पोलीस आणि सीआरपीएफच्या संयुक्त दलावर हल्ला चढवला होता. याही परिसरात सीआरपीएफकडून शोधमोहिम सुरू आहे. 
 

Web Title: Jammu Kashmir terrorists attack joint team of police and crpf at naka in sopore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.