Jammu-Kashmir: 16 ठिकाणांवर NIA ची छापेमारी, 'ISIS-व्हॉईस ऑफ हिंद' आणि 'IED रिकव्हरी' प्रकरणात कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2021 12:40 PM2021-10-10T12:40:27+5:302021-10-10T12:40:37+5:30

एनआयएने याच प्रकरणात 11 जुलै रोजी जम्मू-काश्मीरमधून उमर निसार, तन्वीर अहमद भट आणि रमीज अहमद लोनला अटक केली होती.

Jammu-Kashmir: NIA raids 16 places in jammu-kashmir, takes action in 'ISIS-Voice of Hind' and 'IED recovery' cases | Jammu-Kashmir: 16 ठिकाणांवर NIA ची छापेमारी, 'ISIS-व्हॉईस ऑफ हिंद' आणि 'IED रिकव्हरी' प्रकरणात कारवाई

Jammu-Kashmir: 16 ठिकाणांवर NIA ची छापेमारी, 'ISIS-व्हॉईस ऑफ हिंद' आणि 'IED रिकव्हरी' प्रकरणात कारवाई

googlenewsNext

नवी दिल्ली: राष्ट्रीय तपास यंत्रणे(National Investigation Agency)ने रविवारी 'इसिस-व्हॉईस ऑफ हिंद' आणि 'बाथिंडी आयईडी रिकव्हरी' प्रकरणी जम्मू-काश्मीर(Jammu Kashmir)मधील 16 ठिकाणी छापेमारी केली. दहशतवादविरोधी एजन्सीने केंद्रीय राखीव पोलीस दल (Central Reserve Police Force) आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या(J&K Police) मदतीने विविध जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी शोध घेतला. तसेच, एनआयएने कर्नाटकातील भटकळ येथील दोन ठिकाणांवरही छापे टाकले. यादरम्यान 'इसिस-व्हॉईस ऑफ हिंद' प्रकरणातील मुख्य आरोपी जुफरी जवाहर दामुडीला अटक केली आहे.

एनआयएने म्हटले आहे की, भारतात आयएसआयएस कॅडरसह विविध भागात कार्यरत असलेल्या ISIS दहशतवाद्यांनी ऑनलाइन ओळख असलेले नेटवर्क तयार केले आहे, ज्यामध्ये आयएसआयएसशी संबंधित प्रचार सामग्री प्रसारित केली जाते आणि आयएसआयएसमध्ये सदस्यांची भरती केली जाते. एनआयएने याच प्रकरणात 11 जुलै रोजी जम्मू-काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी शोध घेऊन तीन आरोपी उमर निसार, तन्वीर अहमद भट आणि रमीज अहमद लोनला अटक केली होती. हे सर्वजण अनंतनाग जिल्ह्यातील अचबल भागातील रहिवासी आहेत.

एनआयएने सांगितल्यानुसार, अबू हाजीर अल-बद्री हा सायबर युनिट आयएसआयएसचा एक प्रमुख ऑपरेटर आहे. तो "व्हॉईस ऑफ हिंद" चे दक्षिण भारतीय भाषांमध्ये भाषांतर आणि याला वाढवण्यात सामील आहे. त्याची ओळख जुफरी जवाहर दामुदी अशी होती आणि एनआयए आणि कर्नाटक पोलिसांच्या संयुक्त कारवाईत या वर्षी 6 ऑगस्ट रोजी त्याला अटक करण्यात आली. एजन्सीने सांगितले की, सायबर आयडीचा वापर कट्टरतावादी लोकांची भरती करण्यासाठीही केला जात होता.

Web Title: Jammu-Kashmir: NIA raids 16 places in jammu-kashmir, takes action in 'ISIS-Voice of Hind' and 'IED recovery' cases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.