जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलाला मोठं यश तर श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांनी केला हल्ला 

By पूनम अपराज | Published: December 6, 2020 09:41 PM2020-12-06T21:41:33+5:302020-12-06T21:44:39+5:30

Jammu kashmir : ही घटना श्रीनगरच्या हवल सजगीरपोरा परिसरात घडली आहे. दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात एक पोलीस कर्मचारी आणि नागरिक जखमी आहे.

In Jammu and Kashmir, security forces found 5 kg of explosives, while in Srinagar, terrorists carried out an attack | जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलाला मोठं यश तर श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांनी केला हल्ला 

जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलाला मोठं यश तर श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांनी केला हल्ला 

Next
ठळक मुद्दे गुलगाम परिसरात सुरक्षा दलाने सर्च ऑपरेशन करून ५ किलो स्फोटकं, २ डेटोनेटर्स आणि २ पोस्टर्स हस्तगत केली आहेत.

जम्मू काश्मीर - कुपवाडा येथील गुलगाम परिसरात सुरक्षा दलाने सर्च ऑपरेशन करून ५ किलो स्फोटकं, २ डेटोनेटर्स आणि २ पोस्टर्स हस्तगत केली आहेत. त्यामुळे पुढे होणार घातपात टळला आहे. सीमेवर  दहशतवाद्यांच्या कुरापती दिवसेंदिवस वाढत आहे. जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर परिसरात सुरक्षा दल आणि पोलिसांच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी हल्ला देखील केला आहे. ही घटना श्रीनगरच्या हवल सजगीरपोरा परिसरात घडली आहे. दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात एक पोलीस कर्मचारी आणि नागरिक जखमी आहे.

पोलीस कर्मचारी आणि नागरिकाला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मिळालेल्या माहितीनुसार दहशतवाद्यांनी श्रीनगरमध्ये सुरक्षा दल आणि पोलीस कर्मचारी यांच्या पथकावर हल्ला केला. या हल्ल्यामध्ये दोन जण जखमी झाले आहेत. सुरक्षा दलाने या परिसराला घेरलं असून दहशतवाद्यांचा शोध सुरू केला. सुरक्षा दल आणि पोलीस यांना एकत्र दहशतवाद्यांनी यावेळी टार्गेट केलं आणि हल्ला केला.

जम्मू काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अलमगिरी बाजार परिसरात दहशतवाद्यांनी हा हल्ला केला. दहशतवाद्यांनी पोलिस आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकावर हल्ला करून लक्ष्य केले. फारूख अहमद असं जखमी झालेल्या पोलीस जवानाचं नाव आहे तर दुसरा नागरिक असून दोघांनाही जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. सुरक्षा दलाकडून दहशतवाद्यांचं सर्च ऑपरेशन अजूनही सुरु आहे.  

Web Title: In Jammu and Kashmir, security forces found 5 kg of explosives, while in Srinagar, terrorists carried out an attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.