Jammu And Kashmir : 15 ऑगस्टनंतर जम्मू काश्मीरमधील निर्बंध शिथिल करणार - सत्यपाल मलिक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2019 08:46 AM2019-08-14T08:46:57+5:302019-08-14T09:12:24+5:30

जम्मू काश्मीरमधील निर्बंध 15 ऑगस्टनंतर शिथील करण्यात येणार असल्याची माहिती जम्मू काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी दिली आहे. 

Jammu And Kashmir Restrictions will be eased after August 15 Jammu and Kashmir governor | Jammu And Kashmir : 15 ऑगस्टनंतर जम्मू काश्मीरमधील निर्बंध शिथिल करणार - सत्यपाल मलिक

Jammu And Kashmir : 15 ऑगस्टनंतर जम्मू काश्मीरमधील निर्बंध शिथिल करणार - सत्यपाल मलिक

googlenewsNext
ठळक मुद्दे15 ऑगस्टनंतर जम्मू काश्मीरमधील निर्बंध शिथिल करणार - सत्यपाल मलिक'राज्यातील परिस्थिती सामान्य होत नाही तोपर्यंत यावरील निर्बंध कायम राहतील''आठवडाभरात किंवा दहा दिवसांमध्ये राज्यातील परिस्थिती सामान्य होईल.'

नवी दिल्ली - केंद्रातील मोदी सरकारने सोमवारी (5 ऑगस्ट) ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. त्याअंतर्गत जम्मू-काश्मीरला लडाखपासून वेगळं करण्यात आलं आहे. लडाखला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा बहाल करण्यात आला असून, तिथे विधानसभेची स्थापन करण्यात आलेली नाही. लडाखच्या लोकांनी गेल्या अनेक वर्षांपासून लडाख हा केंद्रशासित प्रदेश व्हावा, अशी मागणी केली होती. कलम 370 हटवण्यापूर्वी केंद्र सरकारने सुरक्षेच्या दृष्टीने राज्यात काही निर्बंध घातले होते. मात्र कलम 370 हटवल्यानंतर हे निर्बंध अधिक कठोर करण्यात आले होते. परंतु आता ते शिथिल केले जाण्याची शक्यता आहे. जम्मू काश्मीरमधील निर्बंध 15 ऑगस्टनंतर शिथिल करण्यात येणार असल्याची माहिती जम्मू काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी दिली आहे. 

सत्यपाल मलिक यांनी 15 ऑगस्टनंतर जम्मू काश्मीरमधील निर्बंध शिथिल करण्यात येतील. तसेच फोन, इंटरनेट या माध्यमांमार्फत युवकांची दिशाभूल करण्याचं तसेच त्यांना भडकवण्याचं काम करण्यात येत आहेत. त्यामुळेच राज्यातील परिस्थिती सामान्य होत नाही तोपर्यंत यावरील निर्बंध कायम राहतील असं सांगितलं आहे. आठवडाभरात किंवा दहा दिवसांमध्ये राज्यातील परिस्थिती सामान्य होईल. त्यानंतर निर्बंधदेखील हळूहळू उठवण्यात येणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

कलम 370 हटविल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये जवानांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मात्र या मुद्द्यावरुन काँग्रेसने भाजपावर टीकेचं लक्ष्य केलेलं असताना जम्मू काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी राहुल गांधींना टोला लगावला होता. विमान पाठवतो, स्वत: येऊन काश्मीरची परिस्थिती पाहा असं आवाहन केलं होतं त्यावर राहुल गांधी यांनीही सत्यपाल मलिक यांना विरोधी पक्षाचे नेते आणि मी जम्मू काश्मीर, लडाखला भेट देतो. तुमच्या निमंत्रणासाठी मी कृतज्ञ आहे असं त्यांनी म्हटलं. तसेच आम्हाला विमानाची गरज भासणार नाही परंतु कृपया आम्हाला प्रवास करण्याचे आणि तेथील लोक, मुख्य प्रवाहातील नेते आणि आमच्या सैनिकांना भेटण्याचे स्वातंत्र्य मिळेल याची खात्री करा असं प्रत्युत्तर राहुल गांधी यांनी सत्यपाल मलिक यांना दिलं आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. त्यामुळे प्रत्यक्षात जम्मू-काश्मीरमध्ये काय चाललं आहे, याची माहिती पंतप्रधान मोदींनी देशाला द्यावी, असं आव्हान राहुल यांनी दिलं होतं. त्याला मलिक यांनी प्रत्युतर दिलं होतं. सांप्रदायिक दृष्टीकोनातून कलम 370 हटवण्यात आलेलं नाही. त्यामुळे मी राहुल गांधींना काश्मीरमध्ये येण्याचं निमंत्रण देतो. त्यासाठी मी विमानदेखील पाठवेन. तुम्ही स्वत: परिस्थितीचा आढावा घ्यावा आणि मगच बोला. तुम्ही एक जबाबदार व्यक्ती आहात. त्यामुळे अशा प्रकारची बेजबाबदार विधानं तुम्हाला शोभत नाहीत, असं मलिक म्हणाले होते. 

 

Web Title: Jammu And Kashmir Restrictions will be eased after August 15 Jammu and Kashmir governor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.