इशरत जहाँप्रकरणाचा पुन्हा तपास करण्यात यावा - शत्रुघ्न सिन्हा

By admin | Published: March 2, 2016 11:48 AM2016-03-02T11:48:16+5:302016-03-02T11:58:51+5:30

२००४ साली अहमदाबादमध्ये झालेल्या इशरत जहाँ चकमकप्रकरणाचा पुन्हा तपास करण्यात यावा अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी केली

Ishrat Jahan Prasharan should be investigated again - Shatrughan Sinha | इशरत जहाँप्रकरणाचा पुन्हा तपास करण्यात यावा - शत्रुघ्न सिन्हा

इशरत जहाँप्रकरणाचा पुन्हा तपास करण्यात यावा - शत्रुघ्न सिन्हा

Next

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. २ - २००४ साली अहमदाबादमध्ये झालेल्या इशरत जहाँ चकमकप्रकरणाचा पुन्हा तपास करण्यात यावा अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी केली आहे. सोशल नेटवर्किंग साईट ट्विवटरवरून शत्रुघ्न सिन्हा याप्रकरणी भाष्य करत पारदर्शकतेसाठी या प्रकरणाची पुन्हा तपासणी व्हावी असे म्हटले आहे. 
' प्रामाणिकपणा व पारदर्शकतेसाठी इशरत जहॉं प्रकरणाची पुनर्तपासणी व्हायला हवी. याप्रकरणी तत्कालिन "प्रभावी‘ (माजी) गृहमंत्री चिदंबरम व इतरावंर करण्यात आलेल्या आरोपांची सथोल तपासले पाहिजेत. आणि ज्यांचा या प्रकरणात सहभाग नाही, त्यांना आपले निर्दोषत्व सिद्ध करण्याची ही संधी आहे' असे सिन्हा यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. ' दूध का दूध और पानी का पानी होना जरूरी आहे' असेही त्यांनी नमूद केले आहे. 
 
दरम्यान इशरत जहाँ दहशतवदी असल्याचा व तिचा लष्कर-ए-तोयबाशी संबंध असल्याचा उल्लेख गाळून, तयार करण्यात आलेल्या दुस-या प्रतिज्ञापत्रावर माझ्याकडून जबरदस्तीने सही करून घेण्यात आली होती असा गौप्यस्फोट गृहविभागाचे तत्कालिन अधिकारी आरव्हीएस मणी यांनी केला. त्या प्रतिज्ञापत्रावर सह्या करण्यासाठी माझ्यावर जबरदस्ती करण्यात आली, माझा छळ करून मला सिगारेटचे चटके देण्यात आले, असा आरोपही मणी यांनी केला. 
इशरत प्रकरणात दोन प्रतिज्ञापत्रे बनवण्यात आली होती. पहिल्या प्रतिज्ञापत्रात इशरतसह चार दहशतवादी चकमकीत ठार झाल्याचे आल्याचे म्हटले होते. मात्र, दोन महिन्यातच सरकारने घूमजाव करत प्रतिज्ञापत्र बदलले. मी मात्र पहिल्याच प्रतिज्ञापत्रावर ठाम होतो. दुस-या प्रतिज्ञापत्रावर मला जबरदस्तीने सही करावी लागली, असे मणी यांनी स्पष्ट केले. 
दरम्यान या चकमकीशी संबंधित सर्व फाइल्स, शपथपत्रे आणि अन्य कागदपत्रे यांचा शोध घेण्यास गृहमंत्रालयाने सुरुवात केली आहे. याप्रकरणात इशरत दहशतवादी असल्याचा उल्लेख टाळायला लावणारे शपथपत्र दाखल करण्याप्रकरणी तत्कालिन गृहमंत्री व काँग्रेस नेते पी़ चिदंबरम अडचणीत येण्याची चिन्हे आहेत़. तसेच काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचीही यात काही भूमिका होती का? याची छाननी होण्याची शक्यता असल्याचे संकेत दूरसंचारमंत्री रवीशंकर प्रसाद यांच्यासारख्या भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून मिळत आहेत.

 

Web Title: Ishrat Jahan Prasharan should be investigated again - Shatrughan Sinha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.