सिंचन घोटाळा प्रतिक्रिया.....

By Admin | Updated: December 12, 2014 23:49 IST2014-12-12T23:49:18+5:302014-12-12T23:49:18+5:30

सत्य बाहेर येईल

Irrigation scam reaction ..... | सिंचन घोटाळा प्रतिक्रिया.....

सिंचन घोटाळा प्रतिक्रिया.....

्य बाहेर येईल
राज्यात भारतीय जनता पक्षाचे शासन आहे. ते स्वत:ला हवे ते निर्णय घेण्यास स्वतंत्र आहेत. त्यांच्या निर्णयावर काहीही आक्षेप नाही. चौकशी झाल्यानंतर सत्य बाहेर येईल.
अजित पवार, तत्कालीन उपमुख्यमंत्री
------------------
चौकशीला सहकार्य करू
राष्ट्रवादी काँग्रेस पहिल्या दिवसापासूनच निष्कलंक आहे. आम्ही चौकशीला पूर्णपणे सहकार्य करू. चौकशी झाल्यानंतर राज्यातील जनतेला सत्य काय आहे ते कळेल.
सुनील तटकरे, तत्कालीन जलसंसाधन मंत्री
-------------------
मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन
सिंचन घोटाळ्याच्या चौकशीचा निर्णय घेऊन दिलेला शब्द पाळल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन. हा निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचा आहे. घोटाळा झाला नसता तर रखडलेले सिंचन प्रकल्प कधीचेच पूर्ण झाले असते. शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या नसत्या. भविष्यात शेतकऱ्यांसाठी चांगले दिवस येतील, असा विश्वास आहे.
ॲड. अनिल किलोर, जनमंच

Web Title: Irrigation scam reaction .....

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.