IRCTC New Rules : Online तिकिट बुकिंगच्या नियमांत बदल; Mobile नंबर व्हेरिफाय करणं अनिवार्य

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2021 12:11 PM2021-08-27T12:11:49+5:302021-08-27T12:18:05+5:30

IRCTC Ticket Booking New Rule : IRCTC च्या वेबसाईवर लॉग इन केल्यास तुम्हाला मोबाइल व्हेरिफिकेशन आणि ई मेल व्हेरिफिकेशनचे पर्याय मिळणार. व्हेरिफिकेशन केल्यानंतरच मिळणार तिकिट.

IRCTC New Rules Changes in Online Ticket Booking Rules Mobile Email verification is mandatory | IRCTC New Rules : Online तिकिट बुकिंगच्या नियमांत बदल; Mobile नंबर व्हेरिफाय करणं अनिवार्य

IRCTC New Rules : Online तिकिट बुकिंगच्या नियमांत बदल; Mobile नंबर व्हेरिफाय करणं अनिवार्य

Next
ठळक मुद्दे IRCTC च्या वेबसाईवर लॉग इन केल्यास तुम्हाला मोबाइल व्हेरिफिकेशन आणि ई मेल व्हेरिफिकेशनचे पर्याय मिळणार. व्हेरिफिकेशन केल्यानंतरच मिळणार तिकिट.

जर तुम्ही अनेक दिवसांपासून ट्रेनचं तिकिट बुक केलं नसेल तर बदललेल्या नियमांची तुम्हाला कदाचित कल्पनाही नसेल. इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिज्म कॉर्पोरेशननं (IRCTC) ऑनलाइनतिकिट बुकिंगच्या नियमांमध्ये काही बदल केले आहेत. दरम्यान, ग्राहकांनी व्हेरिफिकेशन प्रोसेस पूर्ण केली आहे की नाही याची खात्री करून घ्यावी असं IRCTC नं म्हटलं आहे. यामध्ये मोबाईल क्रमांक आणि ईमेल आयडीचा समावेश करण्यात आला आहे. 

व्हेरिफिकेशन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कोणीही ऑनलाइन तिकिट बुक करू शकतं. व्हेरिफिकेशनची प्रक्रिया अतिशय सोपी आहे आणि एका मिनिटांत ती तुम्ही पूर्ण करू शकता. घरबसल्या तुम्ही आरामात ही प्रक्रिया पूर्ण करू शकता. परंतु नियमित तिकिट बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना मात्र या प्रक्रियेतून जावं लागणार नाही. IRCTC च्या ऑनलाइन पोर्टलमार्फत ऑनलाइन तिकिट काढण्याची संधी मिळते. दरम्यान, ग्राहकांना आता लॉग इन पासवर्ड तयार करण्यासाठी ईमेल आणि फोन क्रमांकाची माहिती द्यावी लागेल. याचाच अर्थ ते व्हेरिफाय झाल्यानंतरच तुम्ही तिकिट बुक करू शकता.

कसं कराल व्हेरिफिकेशन ?

  • ज्यावेळी तुम्ही IRCTC पोर्टलवर जाऊन लॉग इन कराल, त्यावेळी व्हेरिफिकेशनची नवी विंडो ओपन होईल.
  • त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा रजिस्टर्ड ईमेल आयडी आणि मोबाईल क्रमांक टाकून सबमिट करावं लागेल.
  • पेजवर एका ठिकाणी तुम्हाला व्हेरिफिकेशनचा पर्याय दिसेल आणि दुसरीकडे एडिट करण्याचा.
  • जर तुम्हाला तुमच्या ईमेल आयडी किंवा मोबाईल क्रमांकात काही बदल करायचा असेल तर तुम्ही एडिट ऑप्शन सिलेक्ट करू शकता.
  • सर्व माहिती भरल्यानंतर तुमच्या दिलेल्या मोबाईल क्रमामंकावर एक OTP येईल.
  • हा ओटीपी पोर्टलवर टाकल्यानंतर तुमचा मोबाईल क्रमांक व्हेरिफाय होईल. याच प्रकारे तुम्हाला ईमेलही व्हेरिफाय करावा लागेल.

Web Title: IRCTC New Rules Changes in Online Ticket Booking Rules Mobile Email verification is mandatory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.