INX MEDIA CASE : १ कोटी जमा करा अन् परदेशात जा!; कार्ति चिदंबरम यांना सुप्रीम कोर्टाने दिली परवानगी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2021 10:16 PM2021-10-25T22:16:39+5:302021-10-25T22:17:04+5:30

INX MEDIA CASE : सुप्रीम कोर्टाच्या रजिस्ट्रीमध्ये एक कोटी रुपये जमा केल्यानंतर कार्ति चिदंबरम यांना रिसतर परवानगी दिली जाणार आहे.

INX MEDIA CASE : Deposit 1 crore and go abroad !; Supreme Court allows Karti Chidambaram | INX MEDIA CASE : १ कोटी जमा करा अन् परदेशात जा!; कार्ति चिदंबरम यांना सुप्रीम कोर्टाने दिली परवानगी

INX MEDIA CASE : १ कोटी जमा करा अन् परदेशात जा!; कार्ति चिदंबरम यांना सुप्रीम कोर्टाने दिली परवानगी

Next
ठळक मुद्देकार्ति चिदंबरम यांना २५ ऑक्टोबर ते २१ नोव्हेंबरपर्यंत परदेशी जाण्यासाठी सशर्त परवानगी सुप्रीम कोर्टानं दिली आहे.

माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचा मुलगा आणि आयएनएक्स मीडिया प्रकरणातील आरोपी कार्ति चिदंबरम यांना २५ ऑक्टोबर ते २१ नोव्हेंबरपर्यंत परदेशी जाण्यासाठी सशर्त परवानगी सुप्रीम कोर्टानं दिली आहे. सुप्रीम कोर्टाच्या रजिस्ट्रीमध्ये एक कोटी रुपये जमा केल्यानंतर कार्ति चिदंबरम यांना रिसतर परवानगी दिली जाणार आहे.

सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सुप्रीम कोर्टाला दिलेल्या माहितीनुसर, कार्ति चिदंबरम यांच्याकडून चौकशीत सहकार्य मिळालेलं नाही. त्याचप्रमाणे चौकशीसाठी जारी करण्यात आलेल्या नोटिसनंतरही ते हजर राहिलेले नाहीत. या बाबींवर निश्चितच विचार केला जाईल, असं यावेळी कोर्टानं नमूद केलं आहे.

कार्ति चिदंबरम यांच्याविरोधातील गुन्हेगारी प्रकरणात सीबीआय आणि अंमलबजावणी संचलनालयाकडून (ईडी) चौकशी सुरू आहे. चिदंबरम यांना सीबीआयने आयएनएक्स मीडिया भ्रष्टाचार प्रकरणी २१ ऑगस्ट २०१९ रोजी अटक झाली होती, त्याच वर्षी १६ ऑक्टोबरला त्यांना ईडीने काळ्या पैशाच्या प्रकरणात अटक केली होती. त्यानंतर सहा दिवसांनी २२ ऑक्टोबरला सर्वोच्च न्यायालयाने चिदंबरम यांना सीबीआयने दाखल केलेल्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर केला होता. सुप्रीम कोर्टाकडून हा सशर्त जामीन मंजूर केला होता. पी. चिदंबरम यांनी चौकशीला सहकार्य करावं अन् देश सोडून जाऊ नये या अटीवर त्यांना जामीन मंजूर झाला. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळे पी. चिदंबरम यांना मोठा दिलासा मिळाला होता. पी. चिदंबरम १७ ऑक्टोबरपासून ईडी कोठडीत होते. १०६ दिवसांपासून चिदंबरम तिहारमधील तुरुंगात होते. 

Web Title: INX MEDIA CASE : Deposit 1 crore and go abroad !; Supreme Court allows Karti Chidambaram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.