मंत्रिमंडळ विस्तारात 'या' आमदाराने घेतली चक्क मुख्यमंत्रिपदाची शपथ; येडियुरप्पा झाले अवाक् 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2019 03:05 PM2019-08-21T15:05:42+5:302019-08-21T15:10:22+5:30

कर्नाटकच्या मुख्यमंत्री बी. एस येडियुरप्पा यांनी अखेर अनेक दिवसानंतर त्यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार केला.

Instead of taking oath as minister, MLA takes oath as CM; Yeddyurappa became speechless | मंत्रिमंडळ विस्तारात 'या' आमदाराने घेतली चक्क मुख्यमंत्रिपदाची शपथ; येडियुरप्पा झाले अवाक् 

मंत्रिमंडळ विस्तारात 'या' आमदाराने घेतली चक्क मुख्यमंत्रिपदाची शपथ; येडियुरप्पा झाले अवाक् 

googlenewsNext

बंगळुरु - कोणत्याही राजकीय नेत्याला त्यांच्या आयुष्यात एकदा तरी मुख्यमंत्री बनण्याचं स्वप्न हे असतंच. मुख्यमंत्री पद मिळत असेल तर कोणीही सोडणार नाही. मात्र आपल्याला मंत्रिपदाची शपथ घ्यायची आहे ते विसरुन एका आमदाराने चक्क मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याने हा विषय चर्चेला आला आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्री बी. एस येडियुरप्पा यांनी अखेर अनेक दिवसानंतर त्यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार केला. या मंत्रिमंडळाच्या विस्तारात १७ आमदारांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. मात्र यामधील एका आमदाराने मुख्यमंत्र्यासमोरच मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याने सगळे उपस्थित मंडळीही अवाक् झाली. 

कर्नाटकमधील आमदार मधु स्वामी यांना आज मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी बोलविलं. त्यावेळी शपथ घेताना त्यांनी मंत्रिपदाऐवजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अचानक घडलेल्या या प्रकाराने काही क्षण मधु स्वामी यांची तारांबळ उडाली मात्र व्यासपीठावर उपस्थित असलेले मुख्यमंत्री बी. एस येडियुरप्पा यांनी स्वामींकडे पाहत स्मित हास्य केलं आणि त्यांना मिठी मारल्याने उपस्थितांमध्ये हशा पिकला. 

बी. एस येडियुरप्पा यांनी २६ जुलै रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर आज त्यांच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार झाला. २९ जुलै रोजी त्यांनी विधानसभेत बहुमत सिद्ध केलं. राज्यपाल वजूभाई वाला यांनी राजभवनमध्ये नवीन मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. या मंत्रिमंडळ विस्तारात माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टार, दोन माजी उपमुख्यमंत्री के. एस ईश्वरप्पा, आर. अशोक, अपक्ष आमदार एच नागेश, लक्ष्मण सावदी, आमदार श्रीनिवास पुजारी यांचा समावेश आहे. 

याशिवाय गोविंद एम. करजोल, अश्वथ नारायण सी एन, बी श्रीरामुलु, एस. सुरेश कुमार, वी. सोमन्ना, सी टी रवी, बासवराज बोम्मई, जे. सी मधु स्वामी, सी.सी. पाटील, प्रभु चौहान आणि शशिकला जोले अन्नासाहेब यांनी शपथ घेतली. येडियुरप्पा यांच्या मंत्रिमंडळात सहभागी झालेल्या शशिकला या एकमेव महिला आहेत. कर्नाटकात मुख्यमंत्र्यांसह जास्तीत जास्त ३४ मंत्री असतील. 

दरम्यान काँग्रेसच्या १७ बंडखोर आमदारांना कर्नाटक विधानसभेच्या याआधीच्या अध्यक्षांनी अपात्र ठरविले असून, त्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. न्यायालयाचा निकाल येईपर्यंत या बंडखोर आमदारांना मंत्रिमंडळात समाविष्ट करता येणार नाही हे भाजपने येडियुरप्पांच्या शपथविधीच्या वेळीच स्पष्ट केले होते. मात्र मंत्रिपदाची आस असलेले भाजपमधील आमदारही गप्प बसायला तयार नाहीत. त्या पक्षाचे आमदार जी. एच. थिप्पा रेड्डी यांनी म्हटले आहे की, भाजपमधील निष्ठावान व ज्येष्ठ आमदारांना मंत्रीपदापासून डावलण्यात आले आहे हे पक्षश्रेष्ठींच्या निदर्शनास आणून दिले जाईल. त्यासाठी पक्षातील समविचारी आमदार लवकरच एक बैठकही घेणार आहेत असं सांगण्यात आलं आहे.  

Web Title: Instead of taking oath as minister, MLA takes oath as CM; Yeddyurappa became speechless

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.