ITI झालेल्यांसाठी नौदलात शेकडो जागांवर नोकरीची संधी; पगार 57 हजार 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2021 08:02 PM2021-02-22T20:02:02+5:302021-02-22T20:05:32+5:30

ITI level Jobs 2021: दहावी झाल्यानंतर नोकरी नाही मिळाली तर निदान गॅरेज, वर्कशॉप खोलून काम तरी करता येईल म्हणून आयटीआय (ITI Course) करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. भारतीय नौदलामध्ये (Indian Navy) शेकडो जागांवर नोकरीची संधी चालून आली आहे.

Indian Navy Jobs: recruitment on 1159 posts of tradesman for ITIs; Salary 57 thousand | ITI झालेल्यांसाठी नौदलात शेकडो जागांवर नोकरीची संधी; पगार 57 हजार 

ITI झालेल्यांसाठी नौदलात शेकडो जागांवर नोकरीची संधी; पगार 57 हजार 

Next

दहावी झाल्यानंतर नोकरी नाही मिळाली तर निदान गॅरेज, वर्कशॉप खोलून काम तरी करता येईल म्हणून आयटीआय (ITI Course) करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. भारतीय नौदलामध्ये (Indian Navy) शेकडो जागांवर नोकरीची संधी चालून आली आहे. नौसेनेने एन्ट्रन्स परीक्षेद्वारे ट्रेड्समन मेट (INCET TMM) साठी 1200 पदांवर भरती काढली आहे.  (recruitment for the post of tradesman in Indian Navy 2021.)

पदाचे नाव - ट्रेड्समन मेट (Tradesman Mate)
पदांची संख्या 
ईस्टर्न नेव्हल- 710
वेस्टर्न नेव्हल - 324 पदे
साउदर्न नेव्हल - 125 पदे
एकूण पदांची संख्या - 1159

पगार...
या पदांसाठी 18 हजार रुपयांपासून 56,900 रुपये प्रति महिना पगार आणि याशिवाय केंद्र सरकारचे भत्ते असा पगार दिला जाणार आहे. 

वय आणि शिक्षणाची अट...
मान्यताप्राप्त बोर्डामधून उमेदवार 10 वी पास हवा. याशिवाय मान्यता प्राप्त संस्थेतून आयटीआय झालेला असायला हवा. तसेच उमेदवाराचे वय 18 ते 25 वर्षे असायला हवे. आरक्षणातून अर्ज करणाऱ्यांसाठी वयाची अट शिथिल करण्यात येणार आहे. अर्ज करण्यासंबंधीच्या लिंक खाली देण्यात आल्या आहेत. 
या पदांसाठी इंडियन नेव्हीच्या अधिकृत वेबसाईट joinindiannavy.gov.in वर जाऊन ऑनलाईन जाऊन अर्ज करायचा आहे. 22 फेब्रुवारी म्हणजे आजपासूनच अर्ज करण्याची सुरुवात झाली आहे. 7 मार्च संध्याकाळी 5 वाजेपर्यंत अर्ज करता येणार आहे. जनरल, ओबीसी आणि ईडब्ल्यूएससाठी अर्ज शुल्क 205 रुपये आहे. तर इतरांसाठी कोणतेही शुल्क नाहीय.


निवड कशी केली जाणार? 
भारतीय नौदलात निघालेल्या या भरतीची परीक्षा ही ऑनलाईन, कॉम्प्युटरवर आधारित असणार आहे. 


Indian Navy TMM Job Notification 2021 साठी इथे क्लिक करा...

अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा...

 

PNB Recruitment 2021: पंजाब नॅशनल बँकेत नोकरीची संधी, परीक्षाही नाही; 12 वी पास करू शकणार अर्ज

बँकेमध्ये नोकरी करु इच्छिनाऱ्या तरुण बेरोजगारांसाठी किंवा नोकरी शोधत असलेल्यांसाठी चांगली संधी चालून आली आहे. महत्वाचे म्हणजे यासाठी उच्चशिक्षण किंवा कोणत्याही विशेष शाखेतून शिक्षण घेतल्याची अट नसून परीक्षाही घेतली जाणार नाहीय. देशातील सार्वजनिक क्षेत्रातील दुसऱ्या मोठ्या बँकेने म्हणजेच पंजाब नॅशनल बँकेने (पीएनबी) यावेळी विशेष भरती आयोजित केली आहे. यामुळे देशभरातून कुठूनही तुम्ही अर्ज करू शकणार आहात व तुमच्या भागात नोकरी करू शकणार आहात. (Punjab National Bank Recruitment 2021: Huge Opportunity For 12th Passed Students, Apply Soon)

नोकर भरतीच्या अन्य बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा...

Web Title: Indian Navy Jobs: recruitment on 1159 posts of tradesman for ITIs; Salary 57 thousand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.