रामदेव बाबांमुळे केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन अडचणीत; कोरोनिल लाँचवर 'आयएमए'ने मागितलं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2021 04:10 PM2021-02-23T16:10:01+5:302021-02-23T16:12:37+5:30

Baba Ramdev on Coronil : पतंजलीच्या कोरोनिल या औषधाला WHO चं सर्टिफिकेट मिळाल्याच्या दाव्यावर IMA नं नोंदवला आक्षेप

indian medical association reaction on patanjali coronil questions health minister harshwardhan | रामदेव बाबांमुळे केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन अडचणीत; कोरोनिल लाँचवर 'आयएमए'ने मागितलं उत्तर

रामदेव बाबांमुळे केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन अडचणीत; कोरोनिल लाँचवर 'आयएमए'ने मागितलं उत्तर

Next
ठळक मुद्देडॉ. हर्षवर्धन यांच्या सहभागावर IMA नं नोंदवला आक्षेपIMA नं मागितलं स्पष्टीकरण

कोरोना विषाणू पुन्हा स्ट्रेन बदलत असल्यामुळे सध्या कोरोना रुग्णांच्या उपचारांसाठी वापरात असलेली औषधं निष्क्रीय ठरतील का अशी भीती सगळ्यांमध्येच आहे. त्याच योगगुरू बाबा रामदेव यांनी कोरोनावर रामबाण उपाय शोधल्याचा दावा केला होता. त्यांनी कोरोना संक्रमण रोखण्यासाठी आणखी एक औषध लाँच केले होते.  दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लबमधील एका कार्यक्रमात रामदेवबाबांनी ही घोषणा केली होती. यावेळी त्यांच्यासोबत केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन आणि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरीदेखील उपस्थित होते. यानंतर इंडियन मेडिकल असोसिएशननं आश्चर्य व्यक्त केलं होतं.

इंडियन मेडिकल असोसिएशननं सोमवारी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांना बाबा रामदेव यांच्या पतंजलीचं कोरोनिल हे औषध लाँच केल्याबद्दल स्पष्टीकरण मागितलं आहे. आयएमएनं सोमवारी एक प्रेस रिलिज जारी करत डॉ. हर्षवर्धन यांना अनेक सवालही केले आहे. आयएमएने जारी केलेल्या निवेदनात केंद्रीय आरोग्यमंत्र्यावरही भारतीय वैद्यकीय परिषदेच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

"नियमानुसार कोणतेही डॉक्टर कोणतंही औषध प्रमोट करू शकत नाही. परंतु केंद्रीय आरोग्यमंत्री हे एक डॉक्टर आहेत, त्यांच्याद्वारे औषध प्रमोट करणं आश्चर्य आहे," असंही निवेदनाद्वारे म्हटलं आहे. औषध लाँच केल्यानंतर बाबा रामदेव यांनी माध्यमांशी संवाद साधला होता. त्यावेळी त्यांनी आपल्या संस्थेद्वारे तयाक करण्यात आलेलं कोरोनिलशी निगडीत दस्तऐवज आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रकाशित केल्याचं म्हटलं हतं. तसंच काही वाहिन्यांना दिलेल्या मुलाखतींमध्ये त्यांनी या औषधाला जागतिक आरोग्य संघटना आणि जगातील १५४ देशांची मान्यता मिळाल्याचंही म्हटलं होतं. परंतु जागतिक आरोग्य संघटनेद्वारे याचं खंडन करण्यात आलं. यानंतर आरोग्य मंत्र्यांच्या उपस्थितीवरून आयएनएनं प्रश्न उपस्थित केले होते. 



आचार्य बाळकृष्ण यांनी दिलं स्पष्टीकरण

यानंतर आचार्य बाळकृष्ण यांच्याकडू स्पष्टीकरण देण्यात आलं होतं. जागतिक आरोग्य संघटनेनं या औषधाला स्वीकारलं किंवा नाकारलही नाहीये. डब्ल्यूएचओ जगभरातील लोकांसाठी एक चांगले, आरोग्यदायी भविष्य घडविण्यासाठी कार्य करते, असं ते म्हणाले होते. 

Web Title: indian medical association reaction on patanjali coronil questions health minister harshwardhan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.