'या' तारखेपासून कमी व्हायला लागेल कोरोनाचा प्रकोप, ज्योतिषांनी वर्तवले भाकीत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2020 05:49 PM2020-03-18T17:49:25+5:302020-03-18T18:15:39+5:30

कोरोनाचे संकट केव्हा जाते याचीच सर्वजण वाट पाहत आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी जगभरातील वैज्ञानिकही औषध शोधून काढण्यासाठी दिवसरात्र एक करत आहेत. अशातच काही हिंदी वेबसाईट्सनी ज्योतिषांचा अंदाज जाणून घेतला. त्यात ज्योतिशांनी हे भाकीत वर्तवले आहे.

Indian astrologers predicted about ending of coronavirus sna | 'या' तारखेपासून कमी व्हायला लागेल कोरोनाचा प्रकोप, ज्योतिषांनी वर्तवले भाकीत

'या' तारखेपासून कमी व्हायला लागेल कोरोनाचा प्रकोप, ज्योतिषांनी वर्तवले भाकीत

Next
ठळक मुद्देजगभरात कोरोनाचे 7,000 हून अधिक बळीव्हायरसमुळे सर्वत्र भीतीचे वातावरण सूर्याच्या मेष राशितील प्रवेशानंतर कोरोनाचा अंतही शक्य असल्याचे ज्योतिषांचे भाकीत

नवी दिल्ली - संपूर्ण जगात कोरोना व्हायरसने हाहाकार घातला आहे. जगभरात या व्हायरसने 7,000 हून अधिक लोकांचा बळी घेतला आहे. तर लाखो लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. या व्हायरसमुळे सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. यातच दिलासादाय बाब म्हणजे, जेव्हा सूर्य मेष राशित प्रवेश करेल तेव्हा कोरोनाचा अंतही शक्य होईल, असे भाकीत ज्योतीष मंडळींनी वर्तवले आहे.

कोरोनाचे संकट केव्हा जाते याचीच सर्वजण वाट पाहत आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी जगभरातील वैज्ञानिकही औषध शोधून काढण्यासाठी दिवसरात्र एक करत आहेत. अशातच काही हिंदी वेबसाईट्सनी ज्योतिषांचा अंदाज जाणून घेतला. त्यात सूर्य 14 एप्रिल 2020 रोजी मेष राशित प्रवेश करेल. यानंतर कोरोनाचा अंतही शक्य होईल, असे भाकीत ज्योतिषांनी वर्तवले आहे. भारताच्या कुंडलीप्रमाणे वृषभ लग्नाच्या कुंडलीत सध्या चंद्रात शनिची अंतर्दशा सुरू आहे.

भारतीय ज्योतिष शास्त्रानुसार राहु आणि शनि हे व्हायरसचे कारक ग्रह मानले जातात. यांच्या प्रकोपामुळेच कोरोना महामारी पसरली आहे. शनि स्वराशीमध्ये (मकर) असल्याने ही महामारी सातत्याने वाढत आहे. 

संपूर्णानंद संस्कृत विद्यापीठाचे देवज्ञ कृष्ण शास्त्री यांनी अमर उजाला या वेबसाइटशी बोलताना म्हटले आहे, की सध्या राहु उच्च राशि मिथूनमध्ये गोचर करत आहेत. हा भारताच्या कुंडलीचा द्वितीय भाव आहे. याला कालपुरुषाच्या कुंडलीमध्ये तोंड, नाक, कान आणि घसाचे कारक मानले जाते. राहु लग्नस्थ आणि शुक्र षष्टेश होऊन शनिसह तृतीयस्थ आहेत. अर्थात तृतीय भावाप्रमाणे, श्वास नलीका, दमा, खोकला, फुफूसाशी संबंधित आजार होत आहेत.

चंद्र हा ऑक्सीजनचा कारक आहे. चंद्र आपल्या स्वराशीत आहे. त्यामुळे येथे या व्हायरसचा प्रभाव कमी आहे. मात्र, जेव्हा देव गुरू बृहस्पती 30 मार्चला आपल्या नीच राशित म्हणजेच मकर राशीत गोचर करतील, तेव्हा याचा प्रभाव वाढू शकतो, असेही देवज्ञ कृष्ण शास्त्री यांनी म्हटले आहे.

Web Title: Indian astrologers predicted about ending of coronavirus sna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.