भारतीय लष्करानं उडवली शत्रूंची झोप, पुन्हा केला सर्जिकल स्ट्राइक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2019 07:53 AM2019-03-16T07:53:44+5:302019-03-16T07:54:00+5:30

पाकिस्तानमधल्या बालाकोटमध्ये भारतीय हवाई दलानं केलेल्या एअर स्ट्राइकनंतर आता भारतीय लष्करानं म्यानमार सीमेवरील दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले आहेत.

indian army third surgical strike in myanmar border against terrorists onm | भारतीय लष्करानं उडवली शत्रूंची झोप, पुन्हा केला सर्जिकल स्ट्राइक

भारतीय लष्करानं उडवली शत्रूंची झोप, पुन्हा केला सर्जिकल स्ट्राइक

Next

नवी दिल्ली- पाकिस्तानमधल्या बालाकोटमध्ये भारतीय हवाई दलानं केलेल्या एअर स्ट्राइकनंतर आता भारतीय लष्करानं म्यानमार सीमेवरील दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय लष्करानं म्यानमारच्या सैन्याबरोबर मिळून म्यानमारच्या सीमारेषेवर असलेले दहशतवाद्यांची अनेक ठिकाणं नेस्तनाबूत केली आहेत.

दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करण्याचं हे ऑपरेशन 17 फेब्रुवारी रोजी सुरू झालं होतं. ऑपरेशन दोन आठवडे म्हणजेच 2 मार्चपर्यंत सुरू होतं. सूत्रांच्या माहितीनुसार, म्यानमारमधील बंडखोर असलेल्या रोहिंग्या दहशतवादी समूहानं मिझोरामच्या सीमेजवळ नवे तळ बनवले होते. जे कलादान प्रोजेक्टवर निशाणा साधून होते. हा प्रोजेक्ट भविष्यात उत्तर-पूर्वचे नवे प्रवेशाद्वार होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर भारत आणि म्यानमारच्या सैन्यानं संयुक्त मोहीम राबवत मिझोराममधल्या सीमावर्ती भागात नव्यानं तयार करण्यात आलेल्या दहशतवादी शिबिरांना उद्ध्वस्त केलं.

तर या मोहिमेच्या दुसऱ्या भागात टागातील NSCN (K)च्या मुख्यालयावर निशाणा साधण्यात आला आणि अनेक शिबिरं नेस्तनाबूत करण्यात आली. अराकान सैन्याला काचिन इंडिपेंडेंस आर्मीद्वारे ट्रेनिंग देण्यात आलं असून, ते दहशतवादी उत्तर सीमेच्या चीनपर्यंत पसरलेले आहेत. या दहशतवाद्यांनी अरुणाचलला लागून असलेल्या भागापासून ते मिझोराम सीमेपर्यंतच्या 1000 किमी परिसरात वास्तव्य केलं होतं. 

Web Title: indian army third surgical strike in myanmar border against terrorists onm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.