भूतानच्या ज्या भूभागावर चीनने केला दावा, तिथे ड्रॅगनच्या नाकावर टिच्चून भारत बांधणार रस्ता

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2020 09:56 AM2020-07-15T09:56:51+5:302020-07-15T09:58:51+5:30

विस्तारवादी ड्रॅगनला लडाखमध्ये रोखल्यानंतर आता भूतानमध्येही चिनी कारवायांना वेसण घालण्याची तयारी भारताकडून करण्यात आली आहे.

India will build a road in the territory claimed by China in Bhutan | भूतानच्या ज्या भूभागावर चीनने केला दावा, तिथे ड्रॅगनच्या नाकावर टिच्चून भारत बांधणार रस्ता

भूतानच्या ज्या भूभागावर चीनने केला दावा, तिथे ड्रॅगनच्या नाकावर टिच्चून भारत बांधणार रस्ता

Next
ठळक मुद्देचीनने भूतानमधील ज्या भागावर आपला हक्क सांगितला आहे त्या भागातून भारत रस्ता बांधणार चीनच्या सीमेशेजारून या रस्त्यामुळे गुवाहाटी आणि अरुणाचल प्रदेशमधील तवांगमधील अंतर १५० किलोमीटरने कमी होणारया रस्त्यामुळे भारत चीनपेक्षा अधिक वेगाने सीमेवर लष्कराची तैनाती करू शकेल

नवी दिल्ली - आर्थिकदृष्ट्या विकसित झाल्यानंतर गेल्या काही वर्षांत चीनने आपले विस्तारवादी धोरण आक्रमक केले आहे. या धोरणानुसार चीनने सीमावाद असलेल्या शेजारील देशाच्या भूभागावर आपला हक्क सांगण्यास सुरुवात केली आहे. भारताच्या ताब्यातील लडाखमध्ये घुसखोरीचा प्रयत्न केल्यानंतर चीनने भूतानमधील मोठ्या भागावरही आपला दावा ठोकला होता. दरम्यान, विस्तारवादी ड्रॅगनला लडाखमध्ये रोखल्यानंतर आता भूतानमध्येही चिनी कारवायांना वेसण घालण्याची तयारी भारताकडून करण्यात आली आहे. त्यासाठी भारत ड्रॅगनच्या नाकावर टिच्चून चीनने भूतानमधील ज्या भागावर आपला हक्क सांगितला आहे त्या भागातून रस्ता बांधणार आहे.

सामरिक दृष्ट्या महत्त्वपूर्ण ठरणारा हा रस्ता बांधण्याचा निर्णय भारताने घेतला आहे. चीनच्या सीमेशेजारून या रस्त्यामुळे गुवाहाटी आणि अरुणाचल प्रदेशमधील तवांगमधील अंतर १५० किलोमीटरने कमी होणार आहे. तसेच या रस्त्यामुळे भारत चीनपेक्षा अधिक वेगाने सीमेवर लष्कराची तैनाती करू शकेल. उल्लेखनीय बाब म्हणजे केवळ तवांगच नाही तर भूतानचा पूर्व भाग आणि पूर्वोत्तर भारतातील चीनची सीमा लागून असलेल्या भागातही भारतीय लष्कराला वेगाने हालचाली करता येईल.

एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार भारत सरकारने बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनला रस्तेबांधणीचे काम सोपवले आहे. हा रस्ता अरुणाचल प्रदेशमधील तवांग येथील लुमला परिसराला भूतानमधील त्राशीगांगला जोडेल. त्यामुळे तिबेटमधील थिम्पू शहर भारताच्या टप्प्यात येईल. तसेच दळणवळणाच्या सुविधेसोबतच भारत आणि भूतानची सुविधा वाढणार आहे.    

Web Title: India will build a road in the territory claimed by China in Bhutan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.