CoronaVirus in India: देशात हाहाकार! कोरोना बळींचा आकडा 4200 समीप; चार लाखांहून अधिक रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2021 10:12 AM2021-05-08T10:12:29+5:302021-05-08T10:12:43+5:30

Coronavirus in India Latest Updates: देशात आजपर्यंत 2,18,92,676 कोरोनाबाधित साप़डले आहेत. यापैकी 1,79,30,960 बरे झाले आहेत. तर मृतांचा आकडा 2,38,270 वर गेला आहे. सध्या देशात 37,23,446 रुग्ण उपचार घेत आहेत. 

India reports 4,01,078 new CoronaVirus cases, 3,18,609 discharges, and 4,187 deaths today, 8 may 2021 | CoronaVirus in India: देशात हाहाकार! कोरोना बळींचा आकडा 4200 समीप; चार लाखांहून अधिक रुग्ण

CoronaVirus in India: देशात हाहाकार! कोरोना बळींचा आकडा 4200 समीप; चार लाखांहून अधिक रुग्ण

Next

Coronavirus in India Latest Updates: कोरोना व्हायरसची (CoronaVirus) दुसरी लाट लसीकरण आणि बहुतांश राज्यांनी लॉकडाऊन लावूनही थांबण्याचे नाव घेत नाहीय. गेल्या तीन दिवसांपासून सलग नव्या रुग्णांचा आकडा हा चार लाखांच्या पार येत आहे. धक्कादायक बाब म्हणजे मृतांचा आकडाही कमालीचा वाढू लागला आहे. (India reports 4,01,078 new #COVID19 cases, 3,18,609 discharges, and 4,187 deaths in the last 24 hours, as per Union Health Ministry )


केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार (Health Ministry of India) देशात गेल्य़ा 24 तासांत देशात 4,01,078 नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. तर 3,18,609 बरे झाले आहेत. खळबळ उडविणारा आकडा हा मृतांचा आहे. देशात गेल्या 24 तासांत 4,187 जणांचा मृत्यू झाला आहे. 




देशात आजपर्यंत 2,18,92,676 कोरोनाबाधित साप़डले आहेत. यापैकी 1,79,30,960 बरे झाले आहेत. तर मृतांचा आकडा 2,38,270 वर गेला आहे. सध्या देशात 37,23,446 रुग्ण उपचार घेत आहेत. 

लसीकरण का महत्वाचे? 

Corona Vaccination: कोरोना विरोधी लस घेतल्यानंतरही कोरोना होत असल्यानं लसींच्या परिणामकारकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असले तरी लसीकरण किती महत्वाचं आहे हे सांगणारा एक अहवाल नुकताच समोर आला आहे. कोरोनाची लस घेतल्यानंतरही कोरोनाची लागण होणारे रुग्ण उपचारांना उत्तम प्रतिसाद देतात आणि रुग्णालयात दाखल होण्यापासून त्यांना वाचवता येतं, असं एका अभ्यासातून समोर आलं आहे. 

देशातील एकूण १ लाख कोरोना रुग्णांचा अभ्यास करण्यात आला आहे. यातून समोर आलेली अंतिम माहिती अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. पण कोरोनाची लागण झालेल्यांपैकी ६,५०० जण असे आहेत की ज्यांनी कोरोना विरोधी लसीचा पहिला डोस घेतला आहे. 

कोरोना रुग्णांना सेवा देताना डॉक्टर्स सर्वात मोठ्या धोक्याचा सामना करत असतात. त्यामुळे त्यांच्या जीवाला सर्वाधिक धोका असतो. कोरोना लसीमुळे डॉक्टरांना एक बुस्टर मिळाला आहे. लस घेऊनही कोरोना होत असला तरी त्याचं इन्फेक्शनचं प्रमाण अगदीच नगण्य आहे. अगदी सात दिवसांतही रुग्ण बरा होतो. विषाणूची मोठ्या प्रमाणात लागण होत नाही. त्यामुळे लसीबाबतच्या सर्व भ्रामक गोष्टींना बाजूला ठेवून नागरिकांनी लसीकरण करुन घ्यावं, अशी माहिती प्राध्यापक आर.के.धिमान यांनी दिली. 

Web Title: India reports 4,01,078 new CoronaVirus cases, 3,18,609 discharges, and 4,187 deaths today, 8 may 2021

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.