चीनला पूर्णपणे टक्कर देण्याची तयारी, भारत अमेरिकेकडून खरेदी करणार कोट्यवधींची घातक शस्त्रे

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2020 10:33 PM2020-06-23T22:33:10+5:302020-06-23T22:36:23+5:30

चीनला चोख उत्तर देण्यासाठी पूर्व लडाख भागात आणखी M777 अल्ट्रा लाइट होवित्झर तोफा तैनात करण्याची लष्कराची इच्छा आहे. भारताने बालाकोट ऑपरेशननंतरही मे-जून महिन्यात एक्सकॅलिबर अम्युनिशनची ऑर्डर दिली होती. 

India to get more excalibur ammunition from us for m777 howitzers amid china dispute | चीनला पूर्णपणे टक्कर देण्याची तयारी, भारत अमेरिकेकडून खरेदी करणार कोट्यवधींची घातक शस्त्रे

चीनला पूर्णपणे टक्कर देण्याची तयारी, भारत अमेरिकेकडून खरेदी करणार कोट्यवधींची घातक शस्त्रे

Next
ठळक मुद्देभारत अमेरिकेकडून  M777 अल्ट्रा लाइट होवित्झर तोफांसाठी एक्सकॅलिबर अम्युनिशन खरेदी करणार आहे.तिन्ही दलांना आपल्या आवश्यकतेनुसार, 500 कोटी रुपयांपर्यंत विध्वंसक शस्त्र खरेदी करता येतील.भारताने बालाकोट ऑपरेशननंतरही मे-जून महिन्यात एक्सकॅलिबर अम्युनिशनची ऑर्डर दिली होती. 

नवी दिल्ली :भारत-चीन सैन्यांत झालेल्या हिंसक झटापटीनंतर सीमेवरील तणाव वढला आहे. अशातच केंद्र सरकारने आता तिन्ही सैन्य दलांना घातक शस्त्र आणि दारू-गोळा खरेदी करण्यासाठी तब्बल 500 कोटी रुपयांच्या आपातकालीन निधीला मंजुरी दिली आहे. या अंतर्गत भारत अमेरिकेकडून  M777 अल्ट्रा लाइट होवित्झर तोफांसाठी एक्सकॅलिबर अम्युनिशन खरेदी करणार आहे. या सर्व ऑर्डर्स केंद्र सरकारने सैन्याला देण्यात आलेल्या आपातकालीन निधी अंतर्गत देण्यात आल्या आहेत.

केंद्र सरकारने तिन्ही दलांना आपातकालीन स्थितीमध्ये कॅबिनेटची मंजुरी न घेता शस्त्र विकत घेण्याचा अधिकार दिला आहे. यासाठी केवळ उपप्रमुखांच्या मंजुरीची आवश्यकता असते. याचा अर्थ तिन्ही दलांना आपल्या आवश्यकतेनुसार, 500 कोटी रुपयांपर्यंत विध्वंसक शस्त्र खरेदी करता येतील.

चीनच्या दादागिरीला भारताचं चोख उत्तर, टक्कर देण्यासाठी तयार केलं जबरदस्त 'चक्रव्यूह'

एका वृत्त वाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, संरक्षण दलाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 'आम्ही अमेरिकेकडून आणखी एक्सकॅलिबर अम्युनिशन खरेदी करणार आहोत.'

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चीनला चोख उत्तर देण्यासाठी पूर्व लडाख भागात आणखी M777 अल्ट्रा लाइट होवित्झर तोफा तैनात करण्याची लष्कराची इच्छा आहे. भारताने बालाकोट ऑपरेशननंतरही मे-जून महिन्यात एक्सकॅलिबर अम्युनिशनची ऑर्डर दिली होती. 

सानिया मिर्झाच्या पतीवर कोरोनाचं संकट! आज येईल रिपोर्ट; ...तरच मिटेल 'लंबी जुदाई'

50 किमीपर्यंत यांची क्षमता असते. 
एक्सकॅलिबर अम्युनिशनची रेंज इतर शस्त्रांच्या तुलनेत अधिक असते. एक्सकॅलिबर आर्टिलरी अम्युनिशन अगदी बिनचूक निशाणा साधण्यासाठी आणि शत्रूला उद्ध्वस्त करण्यासाठी सक्षम असतात. अत्यंत दाटीवाटीच्या भागातही ते शत्रूच्या लक्ष्याचा बिनचूक वेध घेऊ शकतात. 50 किमीपर्यंत यांची क्षमता असते. 

मोदी सरकारच्या 'या' निर्णयामुळे चीनला झोंबली मिर्ची; ...तर अमेरिका अन् रशियाही कामी येणार नाही, भारताला दिली धमकी

एक्सकॅलिबर अम्युनिशन जीपीएस नेव्हिगेशन सिस्टम आणि सॅटेलाइट सिग्नल्सच्या मदतीने आपले लक्ष अगदी अचूक पणे भेदू शकते. हा 155 एमएम आर्टिलरी गोळा म्हणजेच एक्सकॅलिबर अम्युनिशन 40-50 किलो मीटरच्या टप्प्यात आपले लक्ष्य ओळखून ते अगदी सहजपणे भेदू शकतो.

फायर पावरच्या बाबतीत इंडियन एअरफोर्स ड्रॅगनला भारी; चीनच्या कोणत्याही कोपऱ्यात करू शकते हल्ला!

Web Title: India to get more excalibur ammunition from us for m777 howitzers amid china dispute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.