India China FaceOff: शानदार! जबरदस्त!! २० दिवस भारतीय जवानांनी गाजवले; चीनला दणका

By कुणाल गवाणकर | Published: September 20, 2020 06:37 PM2020-09-20T18:37:26+5:302020-09-20T18:37:43+5:30

चीनला जोरदार धक्का; प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारतीयांचा पराक्रम

India China FaceOff Indian Army has occupied 6 new major heights on LAC with China | India China FaceOff: शानदार! जबरदस्त!! २० दिवस भारतीय जवानांनी गाजवले; चीनला दणका

India China FaceOff: शानदार! जबरदस्त!! २० दिवस भारतीय जवानांनी गाजवले; चीनला दणका

Next

नवी दिल्ली: पूर्व लडाखमध्ये चीनकडून सातत्यानं आगळीक सुरू असताना आता भारतीय जवानांनी मोठं यश मिळवलं आहे. सीमावर्ती भागातील तणाव वाढला असताना भारतीय सैन्यानं जबरदस्त पराक्रम केला आहे. गेल्या २० दिवसांत भारतीय जवानांनी चिनी सीमेजवळील सहा नव्या टेकड्यांवर कब्जा केला आहे. भारतीय सैन्यावर वरचष्मा मिळवण्यासाठी चिनी सैन्य या टेकड्या काबीज करण्याच्या प्रयत्नात होतं. मात्र भारतीय जवानांनी चीनचे मनसुबे उधळून लावले.

भारतीय जवानांनी सहा नव्या टेकड्यांवर कब्जा केला आहे. मागर हिल, गुरुंग हिल, रेजांग ला राचाना ला, मोखपारी आणि फिंगर ४ रिज लाईनवरील सर्वात उंच टेकड्यांवर भारतीय सैन्यानं ताबा मिळवल्याची माहिती उच्च स्तरीय सुत्रांनी दिली. भारतीय जवानांनी वर्चस्व मिळवलेल्या टेकड्या दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत पसरलेल्या आहेत. या भागाचं सामरिक महत्त्व पाहता टेकड्यांवरील वर्चस्वाचा भारतीय जवानांना मोठा फायदा मिळेल.

उद्धव ठाकरे सरकारची डोकेदुखी वाढणार; मराठापाठोपाठ धनगरही राज्यभर आंदोलन करणार

प्रत्यक्ष नियंत्रण रेषेसोबतच उंच टेकड्यांवर वर्चस्व मिळवण्यासाठी भारत आणि चीनच्या सैन्यात २९ ऑगस्टपासून संघर्ष सुरू झाला. चीननं पँगाँग सरोवराच्या दक्षिण किनाऱ्यावरील थाकुंग परिसरातील दक्षिणेकडील टेकड्यांवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला. उच्चपदस्थ सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चिनी सैन्याचे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी पँगाँगच्या उत्तर किनाऱ्यापासून दक्षिण तटापर्यंत कमीत कमी तीन वेळा हवेत गोळीबार करावा लागला.

विमान कंपनीनं भन्नाट शक्कल लढवली; हजारो-लाखोंची तिकिटं हातोहात खपली

ब्लॅक टॉप आणि हेल्मेट टॉप टेकड्या चीनकडील भागांमध्ये येतात. तर भारतीय जवानांनी वर्चस्व मिळवलेल्या टेकड्या भारतीय हद्दीत येतात. भारतीय सैन्यानं सहा टेकड्या ताब्यात घेतल्यानं चीनला धक्का बसला. या भागात आता चीननं जवळपास ३ हजारांची अतिरिक्त कुमक तैनात केली आहे. रेजांग ला, राचाना ला भागात चीननं सैनिकांची संख्या वाढवली आहे. 

Web Title: India China FaceOff Indian Army has occupied 6 new major heights on LAC with China

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.