India China Faceoff: भारत चीनचे सर्व मनसुबे उधळण्याच्या तयारीत; नव्या रणनीतीनं काढणार ड्रॅगनची हवा?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2020 10:44 AM2020-06-28T10:44:01+5:302020-06-28T10:48:24+5:30

चीनला प्रत्युत्तर देण्यासाठी भारताचा वेगळाच डाव; बलाढ्य देशांची साथ मिळणार

India China Faceoff india Says World Should Analyse Cause Of coronavirus Pandemic | India China Faceoff: भारत चीनचे सर्व मनसुबे उधळण्याच्या तयारीत; नव्या रणनीतीनं काढणार ड्रॅगनची हवा?

India China Faceoff: भारत चीनचे सर्व मनसुबे उधळण्याच्या तयारीत; नव्या रणनीतीनं काढणार ड्रॅगनची हवा?

googlenewsNext
ठळक मुद्देभारताकडून कोरोनाच्या फैलावाच्या चौकशीची मागणीलडाखमध्ये सीमावाद उकरून काढणाऱ्या चीनला धक्का देण्याची रणनीतीलायन्स फॉर मल्टिलेटरलिस्मच्या बैठकीत भारत आक्रमक

नवी दिल्ली: चीनच्या वुहानमधून जगात कोरोनाचा फैलाव झाला. त्यामुळे जगभरातून चीनवर टीका झाली. कोरोना विषाणू जाणूनबुजून पसरवण्यात आल्याचे आरोप चीनवर झाले. कोरोनावरील लक्ष विचलित करण्यासाठी चीननं पूर्व लडाखमधील सीमावाद उकरुन काढला. त्यामुळे भारत आणि चीनमधील तणाव वाढला. जगातील दोन मोठ्या देशांमध्ये संघर्ष निर्माण झाल्यानं कोरोना प्रादुर्भावाचा मुद्दा मागे पडला. मात्र आता भारतानं पुन्हा एकदा या मुद्द्यावर भर दिला आहे. त्यामुळे चीनच्या अडचणी वाढणार आहेत. 

लडाखमधील सीमावाद वाढवण्यामागील चीनचा हेतू जगासमोर आणण्याची तयारी भारतानं सुरू केली आहे. कोरोना विषाणू नेमका कुठून पसरला याची चौकशी व्हायला हवी, अशी मागणी भारतानं पहिल्यांदाच जागतिक व्यासपीठावर केली आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलियानं कोरोनासाठी थेट चीनला जबाबदार धरलं आहे. त्यानंतर अमेरिका आणि चीनमधील व्यापारयुद्ध भडकलं. तर ऑस्ट्रेलिया म्हणजे अमेरिकेचा कुत्रा असल्याची जहरी टीका चीनकडून करण्यात आली.

कोरोनाचा फैलाव आणि त्याची तीव्रता याबद्दलची माहिती चीननं लपवल्याचा आरोप भारतानं केला होता. मात्र आता भारतानं आपली भूमिका आणखी आक्रमक केली आहे. कोरोना विषाणूच्या फैलावाची चौकशी करण्याची आग्रही मागणी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी शनिवारी अलायन्स फॉर मल्टिलेटरलिस्मच्या बैठकीत केली. आपल्याला राजकारण बाजूला ठेवून कोरोना नेमका कसा परसला, याकडे लक्ष द्यायला हवं. त्याचं मूळ शोधून काढायला हवं, अशी मागणी जयशंकर यांनी केली. यामुळे भविष्यात अशा प्रकारच्या संकटाचा सामना करण्यासाठी पूर्वतयारी करता येईल, असंदेखील ते म्हणाले.

याआधी जागतिक आरोग्य परिषदेत २० मे रोजी एक प्रस्ताव मंजूर करण्यात आला. कोरोना विषाणू नेमका कुठून आला आणि तो लोकांमध्ये कसा पसरला, हे शोधून काढण्याची मागणी प्रस्तावातून करण्यात आली. या प्रस्तावाला १२२ देशांनी पाठिंबा दिला. कोरोना विषाणू प्राण्यांच्या माध्यमातून माणसांपर्यंत पोहोचला. वुहानमधील मांस बाजार कोरोनाच्या फैलावासाठी जबाबदार असल्याचा दावादेखील काही वृत्तांमधून करण्यात आला आहे.

...म्हणून लडाखमधील दु:साहसाची चीनला मोजावी लागेल मोठी किंमत

झटापट झालेल्या भागात चीननं उभारले १६ कॅम्प; ड्रॅगन मोठ्या घुसखोरीच्या प्रयत्नात? 

Web Title: India China Faceoff india Says World Should Analyse Cause Of coronavirus Pandemic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.