India China Faceoff : 'मुलाचा अभिमान आहे पण 'या' गोष्टीचं दु:ख'; शहीद कर्नल यांच्या आईने व्यक्त केल्या भावना

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2020 08:47 AM2020-06-17T08:47:19+5:302020-06-17T08:54:47+5:30

India China Faceoff : तेलंगणातील कर्नल संतोष बाबू हे शहीद झाले आहेत. देशासाठी मुलाने आपल्या प्राणाचे बलिदान दिले, मला त्याचा अभिमान आहे अशी भावना संतोष यांच्या आईने व्यक्त केली आहे.

India China Faceoff colonel suresh babus mother proud of her sons sacrifice | India China Faceoff : 'मुलाचा अभिमान आहे पण 'या' गोष्टीचं दु:ख'; शहीद कर्नल यांच्या आईने व्यक्त केल्या भावना

India China Faceoff : 'मुलाचा अभिमान आहे पण 'या' गोष्टीचं दु:ख'; शहीद कर्नल यांच्या आईने व्यक्त केल्या भावना

Next

नवी दिल्ली – भारत आणि चीन सैनिकांमध्ये 15 आणि 16 जून रोजी गलवान खोऱ्यात संघर्ष झाला.  भारतीय सीमेवरील गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांनी हल्ल्यात भारताच्या एका कर्नलसह तीन जवान शहीद झाले. याच हल्ल्यात भारताचे आणखी 17 जवान जखमी झाले होते. परंतु त्या परिसरात शून्याखाली असलेल्या तापमानामुळे ते वाचू न शकल्याने शहीदांची संख्या 20 झाली. काही वृत्तसंस्था व वृत्तवाहिन्यांनी भारताने या कारवाईला जशास तसे उत्तर देत चीनचे 43 सैनिक मारल्याचा दावाही केला आहे. तेलंगणातील कर्नल संतोष बाबू हे शहीद झाले आहेत. 

देशासाठी मुलाने आपल्या प्राणाचे बलिदान दिले, मला त्याचा अभिमान आहे अशी भावना संतोष यांच्या आईने व्यक्त केली आहे. तसेच आपला एकुलता एक मुलगा आता कधीच परत येणार नाही या गोष्टीचं दु:ख देखील असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. 'सुरुवातीला आम्हाल जेव्हा हे समजलं तेव्हा आमचा विश्वासच बसला नाही. खूप मोठा धक्का बसला. माझ्या मुलाने अनेक आव्हांनाचा सामना केला आहे' अशा भावना संतोष यांच्या पालकांनी व्यक्त केल्या आहेत. शहीद कर्नल संतोष यांची आई मंजुळा यांनी 'देशासाठी माझ्या मुलाने बलिदान दिले याचा मला अभिमान आहे पण एक आई म्हणून आज मी दु:खी आहे' असं म्हटलं आहे.

संतोष यांच्या कुटुंबात त्यांची पत्नी संतोषी, मुलगी अभिज्ञा आणि मुलगा अनिरुद्ध आहे. संतोष यांचा सर्वांनाच अभिमान आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. भारतीय लष्कराने म्हटले आहे की, गलवान खोऱ्यातील पॅट्रोलिंग पॉईंट 14 जवळ सैन्य माघारी सुरू असताना दोन्हीकडील सैनिकांत हा संघर्ष झाला. त्यात दोन्ही बाजूचे जवान मृत वा जखमी झाले. मात्र लष्कराने भारताचे किती जवान शहीद झाले, हे स्पष्ट केलेले नाही. दोन देशांच्या सीमेवरील जैसे थे स्थिती बदलण्याचा प्रयत्न चीनने केल्यामुळे दोन्ही बाजूंच्या सैन्यांमध्ये संघर्ष झाला, असे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने जाहीर केले.  सीमेवर चीनच्या या कागाळीमुळे देशभर संतापाचे वातावरण आहे.

भारतात चीनविरोधात वातावरण पेटलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAIT) या व्यापारी संघटनेने देशात आयात केल्या जाणाऱ्या चिनी उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. कॅटने यासाठी 500 हून अधिक चिनी उत्पादनांची यादी जाहीर केली आहे. लडाखमध्ये चिनी सैनिकांनी भारतीय जवानांवर केलेल्या हल्ल्यावर देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटली असून, व्यापाऱ्यांनी कडक शब्दांत चीनला सुनावलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : कोरोनापासून संरक्षण करणार 'मोदी मास्क'?; लोकांनी दिला असा प्रतिसाद

CoronaVirus News : तुमच्या घरात 'विषारी सॅनिटायझर' तर नाही ना?; CBI ने केलं अलर्ट, वेळीच व्हा सावध

भयंकर! जादुटोण्याच्या संशयातून काकीची हत्या; शिर हातात घेऊन 'तो' 13 किमी चालला अन्...

"सत्ताधाऱ्यांनो सत्तेच्या खाटेची चिंता नंतर आधी पेशंटच्या खाटेचं बघा"  

Sushant Singh Rajput Suicide: सुशांतच्या आत्महत्येनंतर राहुल गांधींचं 'ते' ट्विट व्हायरल; पण...

Fuel Price: महागाईचा चटका! इंधन दरवाढीचा भडका उडणार, दोन आठवडे रोज पेट्रोल-डिझेल महागणार

Web Title: India China Faceoff colonel suresh babus mother proud of her sons sacrifice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.