Video : भारतीय लष्कराची मोठी कारवाई, पाकिस्तानातील दहशतवादी तळ बेचिराख

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2020 11:12 PM2020-04-10T23:12:53+5:302020-04-10T23:38:43+5:30

कुपवाडा जिल्ह्यातील केरन सेक्टरमध्ये पाकिस्तानने केलेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनाला भारतीय लष्कराने शुक्रवारी चोख प्रत्युत्तर दिले.

India carries out precision targeting of terrorist launch pads and ammunition in gun areas sna | Video : भारतीय लष्कराची मोठी कारवाई, पाकिस्तानातील दहशतवादी तळ बेचिराख

Video : भारतीय लष्कराची मोठी कारवाई, पाकिस्तानातील दहशतवादी तळ बेचिराख

Next
ठळक मुद्देपाकिस्तानच्या शस्त्रसंधीला भारतील लष्कराने चोख प्रत्युत्तर दिलेभारतीय लष्कराने पाकिस्तानी दहशतवाद्यांचे तळ आणि शस्त्रसाठा बेचिराख केलाआज सकाळपासूनच पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उलंघन करत गोळीबार सुरु केला होता

श्रीनगर - कोरोनामुळे संपूर्ण जग त्रस्त झाले आहे. भारत आणि पाकिस्तानातही करोना वेगाने हात-पाय पसरू लागला आहे. मात्र, असे असतानाही पाकिस्तानच्या कुरापती सुरूच आहेत. त्यांच्याकडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन होत आहे. मात्र, आज भारतानेही पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देत पाकिस्तानातील दहशतवादी तळ आणि तेथील मोठ्या प्रमाणावर असलेला शस्त्रसाठा उद्धवस्त केला आहे. 

कुपवाडा जिल्ह्यातील केरन सेक्टरमध्ये पाकिस्तानने केलेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनाला भारतीय लष्कराने शुक्रवारी चोख प्रत्युत्तर दिले. यावेळी भारतीय लष्कराने पाकिस्तानमधील गन एरियातील दहशतवादी तळांना आणि तेथे मोठ्या प्रमाणवर असलेला शस्त्रसाठ्याला लक्ष करत ते बेचिराख केले. प्रत्युत्तराच्या या कारवाईत शत्रूचे मोठे नुकसान झाले असल्याची माहिती, संरक्षण प्रवक्त्ये श्रीनागर यांनी दिली आहे.

भारतीय लष्कराने शुक्रवारी सकाळी एलओसीच्या पलिकडे नीलम घाटीच्या दुदनियाल आणि थेजियां भागांत पाकिस्तानी सेन्याच्या हालचाली बघितल्या. पाकिस्तानी सेनिकांचा एक गट एलओसीच्या पुढील भागात येत होता, असेही सांगण्यात येत आहे. यामुळे संबंधित फील्ड कमांडर्सना पाकिस्तानातून घुसखोरीचा प्रयत्न होत अल्याची शंका आली. यानंतर दुपारी साधारणपणे 12 वाजण्याच्या सुमारास पाकिस्तानी सैनिकांनी भारतीय चौक्यांवर गोळीबार करायला सुरुवात केली. तसेच तोफांचाही मारा केला. यात एका घराचे नुकसान झाले. यावर पाकिस्तानने केलेल्या या शस्त्रसंधीच्या उल्लंघणाला भारतीय लष्कराने चोख प्रत्युत्तर देत ही कारवाई केली.
 

Web Title: India carries out precision targeting of terrorist launch pads and ammunition in gun areas sna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.