Nashik Oxygen Leak: नाशिकमधील घटना हृदय पिळवटून टाकणारी; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला शोक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2021 05:25 PM2021-04-21T17:25:03+5:302021-04-21T17:27:55+5:30

मुख्यमंत्र्यांकडून घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश. मृतांच्या वारसांना जाहीर केली ५ लाखांची मदत

Incidents in Nashik oxygen leak is heart wrenching Prime Minister Narendra Modi expressed grief | Nashik Oxygen Leak: नाशिकमधील घटना हृदय पिळवटून टाकणारी; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला शोक

Nashik Oxygen Leak: नाशिकमधील घटना हृदय पिळवटून टाकणारी; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला शोक

googlenewsNext
ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांकडून घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश.मृतांच्या वारसांना जाहीर केली ५ लाखांची मदत

एकीकडे राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा असताना दुसरीकडे नाशिकमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. नाशिकच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयाच्या टाकीला दुपारी १२ च्या सुमारास मोठ्या प्रमाणात गळती सुरु झाली. या ऑक्सिजन गळतीच्या दुर्घटनेत काही रुग्णांचा ऑक्सिजन अभावी मृत्यू झाल्याची माहिती जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिली. दरम्यान, या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. 

"ऑक्सिजन टँक लीक झाल्यामुळे नाशिकमधील रुग्णालयात घडलेली घटना ही हृदय पिळवटून टाकणारी आहे. यात जीवितहानी झाल्यानं मन हेलावलं आहे. दु:खाचा डोंगर कोसळलेल्या कुटुंबीयांचं सांत्वन," अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केलं. या घटनेनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना शोक व्यक्त केला. तर, चंद्रकांत पाटील यांनीही घटनेच्या सखोल चौकशीही मागणी केली आहे. त्यानंतर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीही चौकशी होणारच, असं स्पष्टीकरण दिलंय. तसेच, या घटनेचे कोणीही राजकारण करू नये, असेही ते म्हणाले. 



मुख्यमंत्र्यांनीही व्यक्त केलं दु:ख

“कोरोनाच्या संकटामुळे देश दुर्दैवाच्या दुष्टचक्रात सापडला आहे. एकंदरीत कोरोनाशी विषम प्रकारची लढाईच सुरू आहे. कुठे प्राणवायू नाही, कुठे औषधे नाहीत, कुठे बेडस् नाहीत. त्याअभावी रुग्णांचे हाल व मृत्यू होत आहेत. अशात नाशिक महानगरपालिका रुग्णालयातील ऑक्सिजन गळतीच्या दुर्घटनेची बातमी धक्कादायक आहे, मन हेलावणारी आहे," अशी प्रतिक्रियी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिली. तसंच, मृतांच्या वारसांना ५ लाख रुपयांची मदतही त्यांनी जाहीर केली आहे.

Read in English

Web Title: Incidents in Nashik oxygen leak is heart wrenching Prime Minister Narendra Modi expressed grief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.