दीर्घकाळ खाेकला राहिला, तर क्षयराेग तपासणी करा; सुधारित वैद्यकीय मार्गदर्शक सूचना जारी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2022 10:32 AM2022-01-19T10:32:17+5:302022-01-19T10:32:33+5:30

साैम्य लक्षणे असलेल्या रुग्णांनी पाच दिवसांपेक्षा जास्त कालावधीसाठी खूप ताप, खाेकला किंवा श्वास घेण्यास त्रास हाेत असेल तरच वैद्यकीय मदत घ्यावी. अशा रुग्णांनी घरीच विलगीकरणात राहावे व इतर नियमावलींचे पालन करावे, असे सांगण्यात आले आहे. 

If you have been coughing for a long time, get tested for tuberculosis | दीर्घकाळ खाेकला राहिला, तर क्षयराेग तपासणी करा; सुधारित वैद्यकीय मार्गदर्शक सूचना जारी

दीर्घकाळ खाेकला राहिला, तर क्षयराेग तपासणी करा; सुधारित वैद्यकीय मार्गदर्शक सूचना जारी

Next

नवी दिल्ली : केंद्रीय आराेग्य मंत्रालयाने प्राैढ काेराेना रुग्णांचे उपचार आणि व्यवस्थापनासाठी सुधारित वैद्यकीय मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. रुग्णांचा खाेकला दाेन-तीन आठवड्यांहून जास्त काळ कायम राहिल्यास क्षयराेग व इतर आजारांची तपासणी करून घ्यावी, अशी महत्त्वपूर्ण सूचना त्यातून देण्यात आली आहे. साैम्य लक्षणे असलेल्या रुग्णांनी पाच दिवसांपेक्षा जास्त कालावधीसाठी खूप ताप, खाेकला किंवा श्वास घेण्यास त्रास हाेत असेल तरच वैद्यकीय मदत घ्यावी. अशा रुग्णांनी घरीच विलगीकरणात राहावे व इतर नियमावलींचे पालन करावे, असे सांगण्यात आले आहे. 

ऑक्सिजनची पातळी ९० ते ९३ टक्के राहिल्यास अशा रुग्णांना काेविड उपचारांसाठी दाखल करण्यात यावे. ९० टक्क्यांहून कमी ऑक्सिजनची पातळी असलेल्या रुग्णांना आयसीयूमध्ये दाखल करून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्याची सूचना करण्यात आली आहे. 

५० लाखांहून अधिक जणांना दक्षता मात्रा
सुमारे ५० लाखांहून अधिक आराेग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर्स आणि ६० वर्षांहून अधिक वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांनी काेराेना प्रतिबंधक लसीची दक्षता मात्रा घेतली. केंद्रीय आराेग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी ट्वीटरद्वारे ही माहिती दिली. देशात एकूण १५८ काेटींहून अधिक डाेस देण्यात आले आहेत. दक्षता मात्रा घेण्यासाठी जे पात्र आहेत, त्यांनी लवकरात लवकर ती घ्यावी, असे आवाहनही मांडविया यांनी केले.

Web Title: If you have been coughing for a long time, get tested for tuberculosis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.