रॅपीड अँटीजेन टेस्ट निगेटीव्ह आल्यास पुन्हा आरटी-पीसीआर टेस्ट होणार; केंद्र सरकारचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2020 06:32 PM2020-09-10T18:32:57+5:302020-09-10T18:35:34+5:30

दुबार चाचणीसाठी केंद्राने जिल्हा आणि राज्य पातळीवर एक अधिकारी किंवा टीम नियुक्त करण्यास सांगितले आहे. ही टीम जिल्हावार किंवा राज्यातील दररोज रॅपिड अँटीजेन टेस्टच्या रिपोर्टचे परिक्षण करणार आहे.

If rapid antigen test is negative, then RT-PCR Test again; Central Government Orders | रॅपीड अँटीजेन टेस्ट निगेटीव्ह आल्यास पुन्हा आरटी-पीसीआर टेस्ट होणार; केंद्र सरकारचे आदेश

रॅपीड अँटीजेन टेस्ट निगेटीव्ह आल्यास पुन्हा आरटी-पीसीआर टेस्ट होणार; केंद्र सरकारचे आदेश

googlenewsNext

नवी दिल्ली : रॅपिड अँटीजेन टेस्ट निगेटिव्ह आलेल्यांसाठी मोठी बातमी आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्यांना रॅपिड अँटीजेन टेस्ट (Rapid Antigen Tests) चे सर्व लक्षणे दिसणाऱ्य़ा परंतू रिपोर्ट निगेटिव्ह आलेल्यांची पुन्हा चाचणी करण्याचे आदेश दिले आहेत. देशातील वाढत्या कोरोनाबाधितांच्या संख्येमुळे सरकारही घाबरले असून या संशयित रुग्णांची आरटी-पीसीआर (RT-PCR Test) केली जाणार आहे. 

तुकाराम मुंढेंची पुन्हा बदली; जीवन प्राधिकरणात रूजू होण्याआधीच निघाले आदेश

या दुबार चाचणीसाठी केंद्राने जिल्हा आणि राज्य पातळीवर एक अधिकारी किंवा टीम नियुक्त करण्यास सांगितले आहे. ही टीम जिल्हावार किंवा राज्यातील दररोज रॅपिड अँटीजेन टेस्टच्या रिपोर्टचे परिक्षण करणार आहे. हे अशासाठी करण्यात येणार आहे कारण कोरोनाचे लक्षण असलेल्या सर्व रुग्णांच्या निगेटिव्ह प्रकरणांच्या तपासणीत उशिर होऊ नये. या टेस्टमधून एखादा जरी पॉझिटिव्ह रुग्ण सुटला तरीही रुग्णसंख्या वाढण्याची भीती सतावत आहे. 


मंत्रालयानुसार काही मोठ्या राज्यांमध्ये रॅपिड अँटीजेन टेस्ट निगेटिव्ह आलेल्या लोकांची आरटी-पीसीआर टेस्ट केली जात नाहीय. आयसीएमआर आणि आरोग्य मंत्रालयाच्या सुचनांनुसार सर्व कोरोना लक्षणे दिसणाऱ्या (ताप, खोकला किंवा श्वास घेताना त्रास) रुग्णांची रॅपीड टेस्ट निगेटिव्ह आली आहे त्यांची पुन्हा आरएटी-पीसीआर टेस्ट केली जावी, असे म्हटलेले आहे. राज्यांनी संभाव्य कोरोना बाधित रुग्ण जाऊ नये याची काळजी घेतलीच पाहिजे असे म्हटले आहे. 

ऑक्सफोर्डची लस दिल्यानंतर महिलेवर 'असा' परिणाम झाल्यानं चाचणी थांबवली; अ‍ॅक्स्ट्राजेनेकाच्या प्रमुखांचा खुलासा


रॅपिड अँटीजेन टेस्ट आणि आरएटी-पीसीआर टेस्टमध्ये कोरोना व्हायरसची तपासणी केली जाते. यामध्ये नाक आणि घशातील स्वॅबचे नमुने घेतले जातात. अँटीजेन टेस्टचा रिझल्ट येण्यास 20 मिनिटे लागतात. तर आरटी- पीसीआर टेस्टचा रिझल्ट 3 ते 4 तासांत येतो. अँटीजेन टेस्टमध्ये जर रुग्ण कोरोना बाधित आढळला तर त्याची विश्वसनियता ही 100 टक्के असते. मात्र, निगेटिव्ह टेस्टमध्ये हीच विश्वसनियता 30 ते 40 टक्के एवढीच आहे. म्हणजेच अनेक रुग्ण आधी निगेटिव्ह येऊन नंतर पॉझिटिव्ह होत आहेत. यामुळे रॅपीड टेस्ट निगेटिव्ह आल्यास आरटी-पीसीआर टेस्ट करण्याचा सल्ला दिला जातो. 

दोन कोटींचे नुकसान; कंगना मुंबई महापालिकेवर गुन्हा दाखल करणार

नशीब म्हणतात! लॉकडाऊनमध्ये घर सफाईवेळी जॅक'पॉट' लागला; किंमत ऐकूनच भिरभिरला

मुकेश अंबानींना तगडा भिडू मिळणार; 'जगज्जेता' 20 अब्ज डॉलर गुंतवण्याच्या तयारीत

Reliance Jio दणका करणार; स्वस्त किंमतीचे 1 कोटी स्मार्टफोन विकणार

WhatsApp वरील समाजकंटकांपासून कसे वाचाल? जाणून घ्या टिप्स अन् रहा सुरक्षित

Web Title: If rapid antigen test is negative, then RT-PCR Test again; Central Government Orders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.