IED blast again in Pulwam, 2 army soldiers martyred | पुलवामात पुन्हा आयईडी स्फोट, सैन्याचे 2 जवान शहीद
पुलवामात पुन्हा आयईडी स्फोट, सैन्याचे 2 जवान शहीद

श्रीनगर - काश्मीर खोऱ्यातील सीमारेषेवर दहशतवाद्यांचे भ्याड हल्ले सुरुच आहेत. पुलवामा येथे पुन्हा एकदा स्फोट घडवून आणण्यात आला आहे. येथे दहशतवाद्यांनी केलेल्या आयईडी स्फोटात दोन जवान शहीद झाले असून दोन स्थानिक नागरिक गंभीर जखमी आहेत. सुरक्षा जवानांच्या पेट्रोलिंग करणाऱ्या 44 आरआर या मोबाईल व्हॅनवर हा हल्ला करण्यात आला होता. 

काश्मीरमधील अनंतनाग आणि पुलवामा येथे दहशतवाद्यांकडून गेल्या 24 तासांपासून हल्ले सुरूच आहेत. या हल्ल्यात 2 जवान शहीद झाले असून 9 जवान जखमी आहेत. सोमवारी दहशतवाद्यांकडून जवानांच्या मोबाईल व्हॅनला आयईडी स्फोटाने लक्ष्य करण्यात आले. या हल्ल्यात जखमी झालेल्या दोन जवानांनी उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. तर, जखमी जवानांना आर्मी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दहशतवाद्यांच्या या हल्ल्याला सुरक्षा जवानांकडूनही चोख प्रत्युत्तर देण्यात येत आहे. सुरक्षा जवानांनी दोन दहशतवाद्यांचा खात्माही केला आहे. दरम्यान, सोमवारी अनंतनाग येथे दहशतवाद्यांशी दोन हात करताना उत्तर प्रदेशचे सुपुत्र मेजर केतन शर्मा यांना वीरगती प्राप्त झाली आहे.  


Web Title: IED blast again in Pulwam, 2 army soldiers martyred
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.