Job Alert: ग्रामीण बँकांमध्ये बंपर भरती; पीओ, क्लार्कच्या हजारो पदांसाठी IBPS चे नोटिफिकेशन जारी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2021 12:57 PM2021-06-08T12:57:16+5:302021-06-08T12:58:12+5:30

IBPS RRB Recruitment 2021: अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवार ibps.in जाऊन अर्ज करू शकतात. अप्लाय करण्याची शेवटची तारीख 28 जून, 2021 आहे. ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी तुम्हाला आम्ही खाली लिंक देणार आहोत.

IBPS RRB PO/Clerk Recruitment 2021: Bumper Recruitment in Rural Banks; Notification issued by IBPS 10000 posts | Job Alert: ग्रामीण बँकांमध्ये बंपर भरती; पीओ, क्लार्कच्या हजारो पदांसाठी IBPS चे नोटिफिकेशन जारी

Job Alert: ग्रामीण बँकांमध्ये बंपर भरती; पीओ, क्लार्कच्या हजारो पदांसाठी IBPS चे नोटिफिकेशन जारी

Next

IBPS RRB Recruitment Notification 2021 Download: इंस्टीट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (IBPS) ने आरआरबी ऑफिसर्स (स्केल 1, 2, 3) आणि ऑफिस असिस्टेंट (मल्टीपर्पज) पदांवर भरतीसाठी नोटिफिकेशन जारी केले आहे. आयबीपीएसच्या ऑफिशिअल वेबासाईटवरून आजपासून अर्ज प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. (IBPS Regional Rural Bank (RRB) has activated the online application link for the post of Officers Scale-I (PO), Office Assistant - Multipurpose (Clerk) and Officers Scale II & III under CRP RRB X)


अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवार ibps.in जाऊन अर्ज करू शकतात. अप्लाय करण्याची शेवटची तारीख 28 जून, 2021 आहे. ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी तुम्हाला आम्ही खाली लिंक देणार आहोत. अर्ज कसा करावा यासाठी वेबसाईटवर गाईडलाईन्स देण्यात आल्या आहेत, त्या नीट वाचाव्या लागणार आहेत. (How to apply for IBPS RRB PO/Clerk Recruitment Online)


ऑफिस असिस्टंट - 5134 पदे
ऑफिसर स्केल 1  - 3876 पदे
ऑफिसर स्केल 2 आणि 3 - 1283 पदे

IBPS RRB PO/Clerk Recruitment 2021: आयबीपीएस कॅलेंडरनुसार या पदांसाठी ऑगस्ट 2021 मध्ये प्राथमिक परीक्षा घेतली जाणार आहे. जे उमेदवार या परीक्षेत पास होतील, त्यांना मुख्य परीक्षेसाठी बोलविण्यात येणार आहे. ऑफिसर्स स्केल 1 (पीओ) मुख्य परीक्षा 25 सप्टेंबर, 2021 रोजी आयोजिक केली जाणार आहे. ऑफिस असिस्टंट (क्लर्क) पदांची मुख्य परीक्षा 3 ऑक्टोबर, 2021 ला आणि ऑफिसर स्केल 2 और 3 साठी परीक्षेचे 25 सप्टेंबर, 2021 ला आयोजन केले जाणार आहे. 


 शिक्षण आणि वयाची अट...
आरआरबी ऑफिसर्स (स्केल 1, 2, 3) आणि ऑफिस असिस्टंट (मल्टीपर्पज) साठी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी. पदांनुसार याची माहिती नोटिफिकेशन लिंकमध्ये देण्यात आली आहे. 

ऑफिस असिस्टंट (मल्टीपर्पज) साठी वयाची अट 18 ते 28 वर्षे
ऑफिसर स्केल 1 (असिस्टंट मॅनेजर) वयाची अट 18 ते 30 वर्षे
ऑफिसर स्केल 2 (मॅनेजर) वयाची अट 21 ते 32 वर्षे 
ऑफिसर स्केल 3 (सीनियर मॅनेजर) वयाची अट 20 ते 40 वर्षे (सर्व वय 1 जून, 2021 नुसार मोजले जाणार)

महत्वाच्या लिंक....
ऑफिस असिस्टंट भरतीसाठी इथे क्लिक करा...

ऑफिसर स्केल 1  भरतीसाठी इथे क्लिक करा...

ऑफिसर स्केल 2 आणि 3 भरतीसाठी इथे क्लिक करा...

IBPS RRB X - 10293 ऑफिस असिस्टंट आणि ऑफिसर (स्केल 1, 2, 3) पदांसाठी जाहिरातीची डाऊनलोड लिंकसाठी इथे क्लिक करा....

 

Web Title: IBPS RRB PO/Clerk Recruitment 2021: Bumper Recruitment in Rural Banks; Notification issued by IBPS 10000 posts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.