Hyderabad Rape and Murder case 'Delhi and UP police should get inspiration from Hyderabad police, mayavati bsp supremo | Hyderabad Rape and Murder case 'दिल्ली अन् युपी पोलिसांनी हैदराबाद पोलिसांकडून प्रेरणा घ्यावी'

Hyderabad Rape and Murder case 'दिल्ली अन् युपी पोलिसांनी हैदराबाद पोलिसांकडून प्रेरणा घ्यावी'

हैदराबाद - तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये 27 वर्षीय वेटरनरी डॉक्टरवर बलात्कार करून या पीडितीला जाळून मारण्यात आले आहे. तेलंगणामधील रंगारेड्डी जिल्ह्यातील एका सबवेमध्ये तिचा जळालेला मृतदेह आढळून आला होता. या गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपींचा पोलिसांनी मध्यरात्री एन्काऊंटर केला आहे. त्यामध्ये चारही जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर देशभरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. तर सोशल मीडियावर हैदराबाद पोलिसांचं कौतुक केलं जातंय. उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आणि बसपाच्या अध्यक्षा मायावती यांनीही हैदराबाद पोलिसांकडून इतरांनी प्रेरणा घ्यावी, असे म्हटलंय.

उत्तर प्रदेशमध्ये महिलांवरील गुन्ह्यांच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. पण, येथील राज्य सरकार झोपलंय. उत्तर प्रदेश आणि दिल्ली पोलिसांनी हैदराबादच्या पोलिसांची प्रेरणा घ्यायला हवी, असे मत बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी व्यक्त केले आहे. हैदराबादमधील दिशा बलात्कार आणि खून प्रकरणातील चारही आरोपींचा तेलंगणा पोलिसांकडून एन्काऊंटर करण्यात आला. त्यानंतर, देशभर या घटनेची चर्चा सुरू असून सर्वजण प्रतिक्रिया देत आहेत. मायावती यांनीही पोलिसांच्या या कृत्याचे समर्थन केले आहे. तसेच, उत्तर प्रदेश पोलिसांनी धडा घ्यावा. पण येथील गुन्हेगारांना पाहुण्यांप्रमाणे वागणूक दिली जातेय. येथे उत्तर प्रदेशात जंगलराज असल्याचंही मायावती यांनी म्हटलंय. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तपासावेळी आरोपींना पोलीस घटनास्थळी घेऊन गेले होते. त्यावेळी पोलिसांच्या तावडीतून आरोपींनी निसटण्याचा प्रयत्न केला, पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीही ते पळून जात होते. अखेर पोलिसांनी गोळीबारी केली. त्यात या चारही आरोपींचा मृत्यू झाला आहे.

हैदराबाद बलात्कार पीडितेचे जळालेल्या मृतदेहाचे फोटो पाहून संपूर्ण देश हादरला होता. याप्रकरणी सायबराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली होती. पीडितीच्या हत्याप्रकरणी पोस्टमार्टम अहवालातून धक्कादायक खुलासा समोर आला होता. प्राथमिक माहितीनुसार 4 जणांनी पीडितीवर सामूहिक बलात्कार केला, त्यावेळी जवळपास 7 तास पीडितीला बांधून ठेवण्यात आले होते. बुधवारी रात्री 9.30 वाजल्यापासून गुरुवारी पहाटे 4 वाजेपर्यंत पीडितीवर अत्याचार करण्यात आले. 
दरम्यान, स्कूटरजवळ उभी असताना दिशाने तिच्या बहिणीला फोन केला होता. मी जिथे उभी आहे तिथे मला भीती वाटते आहे असं तिने बहिणीला सांगितलं होतं. या संभाषणानंतर तिचा फोन बंद झाला. शेवटी पीडितीच्या कुटुंबीयांनी शम्शाबाद पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी गुरुवारी सकाळची 6 वाजता दुधवाल्याला जळालेला मृतदेह आढळून आला होता. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Hyderabad Rape and Murder case 'Delhi and UP police should get inspiration from Hyderabad police, mayavati bsp supremo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.