पी. चिदम्बरम अडचणीत कसे आले? एअरसेल - मॅक्सिस प्रकरण काय आहे?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2019 05:40 AM2019-08-22T05:40:58+5:302019-08-22T05:45:01+5:30

एअरसेल टेलिव्हेंचर्स ही सी. शिवशंकर यांची सेलफोन कंपनी, तर मॅक्सिस टेलिकॉम ही मलेशियाच्या टी. आनंद कृष्णन या श्रीलंकेतील उद्योगपतीची कंपनी आहे.

How did P. Chidambaram get in trouble? What's the Aircel -Maxis Case? | पी. चिदम्बरम अडचणीत कसे आले? एअरसेल - मॅक्सिस प्रकरण काय आहे?

पी. चिदम्बरम अडचणीत कसे आले? एअरसेल - मॅक्सिस प्रकरण काय आहे?

googlenewsNext

- सोपान पांढरीपांडे

नागपूर : माजी अर्थमंत्री ज्येष्ठ नेते पी. चिदम्बरम एअरसेल-मॅक्सिस सौदा व आयएनएक्स मीडिया या प्रकरणात अडकले आहेत. ही प्रकरणे चिदम्बरम यूपीए-१ मध्ये अर्थमंत्री असतानाची (२००६ व २००७)आहेत. लाच स्वीकारल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. याबाबत सीबीआय व ईडी चौकशी करत आहे.
एअरसेल टेलिव्हेंचर्स ही सी. शिवशंकर यांची सेलफोन कंपनी, तर मॅक्सिस टेलिकॉम ही मलेशियाच्या टी. आनंद कृष्णन या श्रीलंकेतील उद्योगपतीची कंपनी आहे. २००६ मध्ये एअरसेलमधील शिवशंकर यांचे ७४ टक्के भांडवल मॅक्सिस टेलिकॉमने ४००० कोटींमध्ये विकत घेतले. मॅक्सिस विदेशी कंपनी असल्याने सौद्याला फॉरेन एक्स्चेंज प्रमोशन बोर्डाची परवानगी आवश्यक होती. ती चिदम्बरम यांनी रोखून धरली, असा सीबीआय व ईडीचा आरोप आहे.
चिदम्बरम यांचे चिरंजीव कार्ती यांची आॅसब्रिज होल्डींग्ज अँड इन्व्हेस्टमेंट कंपनी आहे व अ‍ॅडव्हान्टेज स्ट्रॅटेजिक कन्सल्टिंग कंपनीमध्ये ६७ टक्के भागीदार आहेत, असा आरोप भाजपचे खा. सुब्रमण्यम स्वामी यांनी केला आहे. खरे तर आॅसब्रिज ही मोहनन राजेश यांची कंपनी आहे.
अ‍ॅडव्हान्टेज स्ट्रॅटेजिकने २००६ पूर्वी एअरसेलला २६ लाखांचे कर्ज दिले होते. त्या मोबदल्यात शिवशंकर यांना मिळालेल्या ४००० कोटीपैकी ५ टक्के वाटा (२०० कोटी) कार्ती यांना मिळेपर्यंत चिदम्बरम यांनी एफआयपीबीची परवानगी रोखल्याचा स्वामींचा आरोप आहे. कार्ती यांनी १६ जानेवारी २००६ ते २३ सप्टेंबर २००९ या काळात १.८० कोटी चिदम्बरम यांच्या खात्यात ट्रान्सफर केल्याचा स्वामी यांचा आरोप आहे. सीबीआयने कार्ती व पी. चिदम्बरम यांच्याविरोधात २५ आॅक्टोबर २०१५ रोजी आरोपपत्र कोर्टात दाखल केले. २८ फेब्रुवारी २०१८ ला कार्ती यांना अटक केली. ते सध्या जामिनावर आहेत.
टीप : सोशल मीडियावर शेकडो पोस्ट फिरत आहेत, त्यापैकी एक म्हणजे अ‍ॅडव्हान्टेज स्टॅÑटेजिकच्या ४ संचालकांनी (भास्कर रामन, सीबीएन रेड्डी, रवी विश्वनाथन व पद्मा विश्वनाथन) आपले ६०% भांडवल मृत्युपत्राद्वारे कार्ती यांची कन्या आदितीला देण्याची आहे. अ‍ॅडव्हान्टेज स्ट्रॅटेजिकचे ४०% भांडवल मोहनन राजेश यांच्याकडे असल्याचे यात म्हटले आहे. या कंपनीने वासन आयकेअरचे ६०% भांडवल ५० लाखांत घेतल्याचे व उर्वरित ४० % भांडवल मॉरिशसच्या सेक्वोईना कॅपिटलला ४५ कोटींत दिल्याचे म्हटले आहे. पण सीबीआयच्या कागदपत्रांत याचा उल्लेख नसल्याने हा पुरावा नाही. एअरसेल - मॅक्सिस सौदा व चिदंबरम पिता-पुत्र यांचा संबंध हा असा आहे.

Web Title: How did P. Chidambaram get in trouble? What's the Aircel -Maxis Case?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.