how to book confirm train ticket from amazon partnership between amazon india and irctc  | Good News : आता अमेझॉनवर बुक करता येणार रेल्वेचं कन्फर्म तिकीट, अशी आहे प्रोसेस

Good News : आता अमेझॉनवर बुक करता येणार रेल्वेचं कन्फर्म तिकीट, अशी आहे प्रोसेस

ठळक मुद्देआता आपल्याला ई-कॉमर्स कंपनी अमेझॉनच्या प्लॅटफॉर्मवरही रेल्वेचे तिकीट बुक करता येणार आहे. अमेझॉन इंडियाने इंडियन रेल्वे केटरिंग आणि टुरिझ्म कॉर्पोरेशन (IRCTC) सोबत भागीदारी केली आहे. या फिचरनुसार पहिल्या बुकिंगवर कॅशबॅकही देण्यात येणार आहे.

नवी दिल्ली -रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. आता आपल्याला ई-कॉमर्स कंपनी अमेझॉनच्या प्लॅटफॉर्मवरही रेल्वेचे तिकीट बुक करता येणार आहे. अमेझॉन इंडियाने इंडियन रेल्वे केटरिंग आणि टुरिझ्म कॉर्पोरेशन (IRCTC) सोबत भागीदारी केली आहे. यानुसार अमेझॉन यूझर्स कन्फर्म ट्रेन तिकीट मिळवू शकतात. (Amazon India-IRCTC partnership)

या फिचरनुसार पहिल्या बुकिंगवर कॅशबॅकही देण्यात येणार आहे. हा कॅशबॅक अमेझॉन प्राईम मेंबर्ससाठी 12 टक्के तर नॉन प्राईम मेंबर्ससाठी 10 टक्के असेल. मात्र, ही ऑफर लिमिटेड काळासाठीच असेल. यासाठी कुठल्याही प्रकारचा अतिरिक्त सर्व्हिस चार्ज द्यावा लागणार नाही. अमेझॉनवर सीट चेक, सर्व क्लासमध्ये कोटा सर्व्हिस आणि पीएनआर स्टेटस बघण्याची सुविधा असेल.

सर्वात महत्वाचे म्हणजे, अमेझॉन पेवरून पेमेंट करणाऱ्या ग्राहकांना ट्रेन कॅन्सल अथवा बुकिंग फेल झाल्यास तत्काळ रिफंड होईल. ही सुविधा अँड्रॉईड आणि आयओएस, अशा सर्व प्रकारच्या फोनवर उपलब्ध असेल. 

अमेझॉनवर असे बुक करता येईल तिकीट -

  • ही सुविधा अमेझॉन अॅपच्या नव्या व्हर्जनवर मिळेल. आपण मोबाईलवरून बुकिंग करत असाल तर रेल्वे तिकीट ओपन करण्यासाठी आपल्याला क्यूआर कोड स्कॅन करावा लागेल.
  • Amazon.in वर जा आणि ट्रेन तिकीट (‘Train Tickets’) ऑप्शनवर क्लिक करा.
  • आपली रेल्वेगाडी निवडा.
  • पेमेंट सेक्शन पेजवर क्लिक करा आणि योग्य ऑफर निवडा.
  • आपल्या रेल्वे प्रवासाचे डिटेल टाका आणि पेमेंट करा.
  • पेमेंट झाल्यानंतर आपले तिकीट बुक होईल. अधिक माहितीसाठी आपण अमेझॉन डॉट इन (Amazon.in)लाही भेट देऊ शकता.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: how to book confirm train ticket from amazon partnership between amazon india and irctc 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.